Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » आफ्स्पामुळे देशाची प्रतिमा मलीन : सईद

आफ्स्पामुळे देशाची प्रतिमा मलीन : सईद

=मुफ्ती, गिलानींची पुन्हा मुक्ताफळे=
Mufti Mohammad Sayeedजम्मू, [९ मार्च] – सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्यामुळे (आफ्स्पा) देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. हा कायदा अस्तित्वात असो वा नसो, जम्मू-काश्मिरात मानवी हक्कांचे उल्लंघन फार जास्त प्रमाणात झाले आहे, असे मत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
जम्मू-काश्मीरला जो विशेष वैधानिक दर्जा प्राप्त आहे, तो कायम ठेवण्यात यावा. तो काढून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. त्याचप्रमाणे १९६० चा सिंधू जल करारही राज्यासाठी डोकेदुखीचा विषय आहे. या करारामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे, असे सईद यांनी सांगितले. राज्यात आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे. सर्व फुटीरतावादी नेत्यांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे. इतकेच नव्हे, तर जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये थेट व्यापार सुरू व्हावा, असे मला वाटते. दोन्ही काश्मिरात येणे-जाणे करण्यासाठी पासपोर्टची गरजच भासायला नको. काश्मिरींचे राज्य मला येथे आणायचे आहे. एक मुख्यमंत्री या नात्याने मला ते करायचे आहे. माझ्याकडे स्वत:चा वेगळा दृष्टिकोन आहे. थोडा वेळ लागेल. हुर्रियत कॉन्फरन्सचा दृष्टिकोन वेगळा असला, तरी या गटासोबत चर्चा न करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जेव्हा एक दहशतवादी मारल्या जातो, तेव्हा त्याच्या अंत्यसंस्कारात असंख्य लोक सहभागी होतात. जनतेच्या या वेगवेगळ्या भावना आपण विचारात घ्यायलाच हव्या, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21212

Posted by on Mar 10 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1948 of 2452 articles)


=फुटीरवादी कट्टरपंथी नेता मसरतच्या सुटकेवरून वाद, अशा घटना मान्य नाहीत= जम्मू, [८ मार्च] - २०१० मधील शंभराहून अधिक लोकांचे बळी ...

×