Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » आमचे तेलही साठवा आणि मोफत तेल मिळवा

आमचे तेलही साठवा आणि मोफत तेल मिळवा

=संयुक्त अरब अमिरातीची भारताला ‘ऑफर’=
Prime Minister, Narendra Modi meeting with the Vice-President and Prime Minister of UAE, H H Mohammed bin Rashid Al Maktoumनवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] – भारताने आपल्या कच्च्या तेलाच्या साठ्यासह आमचे तेलही साठवून ठेवावे त्याबदल्यात आम्ही त्यांना दोन तृतीयांश तेल मोफत देऊ, अशी ऑफर संयुक्त अरब अमिरातने दिली आहे.
भारताला आपल्या एकूण गरजेपैकी ७९ टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरातील चढउतार लक्षात घेता आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम्, कर्नाटकातील पाडुर आणि मंगलोरमध्ये भूमिगत तेलसाठे तयार करण्यात येत आहेत. यामध्ये ५३.३० लाख टन इतक्या कच्च्या तेलाची साठवणूक करता येईल. जागतिक अस्थिरता आणि आकस्मिक परिस्थितीत या साठ्यांचा वापर केला जाऊ शकेल.
तेल आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी एडनोकने कर्नाटकमधील मंगलोरस्थित १५ लाख टनाच्या साठ्यात अर्धा वाटा उचलण्यात रस दर्शवला आहे. कंपनी मंगलोरच्या साठ्यातील एका भागात ६० लाख बॅरल (७.५ लाख टन) तेलाचा साठा ठेवेल. यापैकी ५ लाख टन तेल भारताला दिले जाईल, ज्याचा वापर संकटकालिन परिस्थितीत करणे शक्य होईल. तसेच एडनोक याचा वापर साठवणुकीसाठी करेल.
भारत दौर्‍यावर आलेले संयुक्त अरब अमिरातचे ऊर्जा मंत्री सुहेल मोहम्मद अल मजरोई यांच्याशी बोलणी झाल्यानंतर प्रधान यांनी सांगितले की, याबाबत करविषयी मुद्दे आधी विचारात घेतले जातील.
कॉंग्रेसशासित कर्नाटक सरकार या साठ्यांकरिता आयात केल्या जाणार्‍या कच्च्या तेलावर वॅट माफ करण्यास राजी नसून अमिरातला मंगलोरस्थित या साठ्याचा वापर करण्यात अधिक रस आहे. जेव्हा जगात तेलाच्या किमती कमी असतील तेव्हा या साठ्याला चांगल्या किमतीत विकता येईल, असा त्यामागे हेतू आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमिरातचा दौरा करून दोन्ही देशांमधील संबंध दृढ केले होते. त्यावेळी अमिरातने भारतात ७५ अब्ज डॉलर गुंतवणूक करण्यात रस दाखवला होता. त्याकरिता भारताने अमिरातला रिफायनरी प्रकल्प, पेट्रोकेमिकल योजना, पाईपलाईन आणि एलएनजी टर्मिनलमध्ये गुंतवणूक करण्याचे सुचविले आहे.
भारताच्या एकुण तेल आयातीमधील ८ टक्के आयात अमिरातकडून केली जाते. यामध्ये वाढ करण्याबाबत विचार सुरू असून २०१६-१७ मध्ये आम्ही १ कोटी ६१ लाख टनच्या खरेदीच्या तुलनेत आणखी २५ लाख टन तेल खरेदी करण्याची योजना बनवली असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26812

Posted by on Feb 12 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (838 of 2458 articles)


इस्लामाबाद, [११ फेब्रुवारी] - २६/११ ला मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हिड हेडली याने दिलेली साक्ष खोटी असून, ...

×