Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » आमदार वारिस पठाण निलंबित

आमदार वारिस पठाण निलंबित

=भारत मातेच्या जयजयकारास नकार=
MIM-warish-pathanमुंबई, [१६ मार्च] – भारत माता की जय म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना आज विधानसभेतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींच्या ‘भारत माता की जय’ म्हणणार नसल्याच्या उद्गीर येथे काढलेल्या विधानाचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ‘भारत माता की जय’ अशी घोषणा कदापि देणार नाही, अशी भूमिका एमआयएमचे आमदार जलील यांनी बुधवारी विधानसभेत घेतली. त्यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधारी आमदारांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. याप्रकरणी वारिस पठाण यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले असून, यासंदर्भातील ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी पठाणांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत मांडला. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनाचा कार्यकाळ संपेपर्यत वारिस पठाण यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
विधानसभेत भाजपाचे आमदार राम कदम यांनी एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांच्याकडे बघून भारत माता की जय असे उद्‌गार काढले. त्यावर वारिस पठाण यांनी, मी ‘भारत माता की जय’ असे म्हणणार नाही, असे उत्तर दिले. त्याला सगळ्याच पक्षांच्या आमदारांनी विरोध केला. वारिस पठाण यांना निलंबित करावे, अशी मागणी नंतर सभागृहात उपस्थित सर्वच आमदारांनी लावून धरली आणि एकच गदारोळ झाला. यानंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.
नंतर कामकाज पुन्हा सुरू होताच हा संपूर्ण देशाचा अपमान आहे, अशा सदस्यांना निलंबित करणे म्हणजे देशाची सेवा करणे होईल, अशी भूमिका भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी घेतली. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी हा भारत मातेचा अपमान असल्याचा आरोप केला. तर या सभागृहाच्या आणि लोकशाहीच्या इतिहासाताल हा काळा दिवस आहे. नकार देणार्‍या अशा सदस्याला या ठिकाणी माफी मागायला सांगा अथवा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांना निलंबित करा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.
असे विधान करायला त्यांना लाज कशी वाटत नाही, असे म्हणत राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा बाजूला ठेवा पण अशा देशद्रोहींना जागा दाखवा, त्यांचे निलंबन करा, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी लावून धरली. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी गटनेत्यांच्या बैठकीनंतर वारिस पठाण यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27387

Posted by on Mar 17 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (634 of 2451 articles)


मुंबई, [१६ मार्च] - पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक यांच्यासाठी पोलिस कल्याण निधी प्राधान्याने वापरला जावा, यासाठी राज्य सरकार पोलिस ...

×