Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आमिरला रस्ते सुरक्षा अभियानातूनही वगळले

आमिरला रस्ते सुरक्षा अभियानातूनही वगळले

amir khan1लखनौ, [१० जानेवारी] – करार संपल्याचे कारण पुढे करीत अतुल्य भारतच्या जाहिरातीतून बॉलीवूड अभिनेता आमिर खानला हटवण्यात आल्यानंतर आता रस्ते सुरक्षा अभियानातूनही त्याला बाद करण्यात आले आहे.
एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आमिर खानला रस्ते सुरक्षा अभियानाचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून निवडले होते. आमिरच्या सत्यमेव जयते या शोमध्ये रस्ते अपघातांविषयीबाबतचा एपिसोड दाखवण्यात आल्यानंतर गडकरी यांनी ऍम्बेेसेडर होण्याबाबत आमिरशी चर्चा केली होती. आता या अभियानातून त्याला हटवण्यात आले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान देशातील वाढत्या असहिष्णुततेबाबत आमिरने विधान केले होते. आपली पत्नी किरण रावने देश सोडून जाण्याबद्दल आपल्याला सुचविले होते, असे विधान त्याने केले होते. त्याच्या या विधानानंतर देशभरातून आमिरवर टीकाही झाली होती. पण त्या वक्तव्यावरून नाही तर करार संपुष्टात आल्याने आमिरला अतुल्य भारतच्या जाहिरातीतून वगळण्यात आल्याचे केंद्रीय पर्यटन खात्याने स्पष्ट केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26480

Posted by on Jan 12 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (922 of 2453 articles)


=अजित डोभाल यांची स्पष्टोक्ती= नवी दिल्ली, [११ जानेवारी] - पंजाबच्या पठाणकोट येथील वायुसेनेच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत ...

×