Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आमिर खानने भारताला दुखावले

आमिर खानने भारताला दुखावले

=व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया=
Venkaiah-Naidu2नवी दिल्ली, [२५ नोव्हेंबर] – अभिनेता आमिर खानने भारतात असहिष्णुता असल्याचे वक्तव्य करून देशाला दुखावले आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू यांनी आज बुधवारी व्यक्त केली.
आमिरने भारताविषयी असे मत जाणूनबुजून व्यक्त केले होते की अजाणतेपणे, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. पण, त्याच्या या उद्गारांनी देशवासी दुखावले आहेत, असे नायडू यांनी सांगितले.
भारत हा जगातील सर्वाधिक सहिष्णू देश आहे, असे प्रत्येकाचे मत आहे. आपल्या शेजारी किंवा पाश्‍चिमात्य देशात काय घडते, हे आपल्याला माहीतच आहे. भारत हा आशावादी आणि शांततापूर्ण देश आहे. दुर्दैवाने आमिरखानसारखा लोकप्रिय अभिनेता असे अपरिपक्व वक्तव्य करतो, हे दुर्दैवच आहे, असे नायडू यांनी स्पष्ट केले. आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. पण, आपल्या वक्तव्यामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसणार नाही, याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी, असेही नायडू म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25742

Posted by on Nov 26 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1149 of 2453 articles)


=भारतीय असल्याचा अभिमान : आमिर खानला उपरती= मुंबई, [२५ नोव्हेंबर] - असहिष्णुतेमुळे भारत सोडण्याची इच्छा माझ्या पत्नीने व्यक्त केली, असे ...

×