Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » आमिर खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

आमिर खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

=कानपूर येथील न्यायालयात याचिका दाखल=
aamir-khanकानपूर, [२५ नोव्हेंबर] – भारत हा असुरक्षित देश असल्याने, हा देश सोडून जाण्याचा विचार माझ्या बायकोने बोलून दाखविला, हे अभिनेता आमिर खानचे वक्तव्य देशविरोधी असल्याने त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका उत्तरप्रदेशच्या कानपूर येथील कनिष्ठ न्यायालयात दाखल करण्यात आली.
स्वत: वकील मनोजकुमार दीक्षित यांनी ही याचिका सादर केली आहे. विशेष म्हणजे, याचिकेतील मुद्दे आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयानेही त्याची याचिका दाखल करून घेतली. आमिरचे वक्तव्य देशविरोधी असल्याने त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी याचिकेत केली आहे. न्यायालयाने येत्या १ डिसेंबर रोजी त्यावर सुनावणी करण्याचे मान्य केले. विशेष म्हणजे, मनोजकुमार यांच्या तक्रारीवरून कानपूर पोलिसांनी आमिरविरोधात भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25745

Posted by on Nov 26 2015. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (1146 of 2452 articles)


=व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया= नवी दिल्ली, [२५ नोव्हेंबर] - अभिनेता आमिर खानने भारतात असहिष्णुता असल्याचे वक्तव्य करून देशाला दुखावले आहे, ...

×