Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आयआयटीची वार्षिक फी वाढली

आयआयटीची वार्षिक फी वाढली

Indian-Institute-of-Technology-IIT-1नवी दिल्ली, [७ एप्रिल] – भारतीय तंत्रविज्ञान संस्थेच्या (आयआयटी) शैक्षणिक शुल्कात तब्बल एक लाख रूपयांची वाढ करण्यात आल्याचे आज गुरूवारी जाहीर झाले. आयआयटीची वार्षिक शुल्क फी ही ९० हजारांहून थेट २ लाख रूपये केले आहे. हा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे.
शैक्षणिक शुल्कात करण्यात आलेल्या या वाढीमुळे पालकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची आयआयटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी धडपड सुरू असते, त्यांना या फी वाढीचा फटका बसणार आहे. आयआयटीमध्ये नव्याने दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांना येत्या नवीन वर्षापासून दुप्पट शुल्क भरून शिक्षण घ्यावे लागणार आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे पाच लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना या शुल्कात दोन तृतीयांश इतकी सवलत दिली जाणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती, अपंग विद्यार्थी आणि एक लाखांपेक्षा कमी उत्नन्न कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार असल्याची माहिती आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27733

Posted by on Apr 7 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (519 of 2453 articles)


एनआयटीमध्ये तणाव केंद्रीय पथक विद्यार्थ्यांना भेटले स्मृती इराणींची मेहबुबांसोबत चर्चा कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन श्रीनगर, [६ एप्रिल] - येथील नॅशनल ...

×