आयएनजी वैश्य बँक कोटक महिंद्रात विलीन
Friday, November 21st, 2014नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] – आयएनजी वैश्य बँक आता कोटक महिंद्रा बँकेत विलीन झाली आहे. या निर्णयावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले आहे. हा निर्णय होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
या विलिनीकरणानंतर आयएनजी वैश्य बँकेच्या समभागधारकांना एक हजार समभागांच्या ऐवजी कोटक महिंद्रा बँकेचे ७२५ समभाग मिळणार आहेत. या व्यवहारावर कोटक महिंद्रा बँक साडेसोळा हजार कोटी रुपये खर्चणार आहे. या निर्णयाची कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हावयाची असून त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची आणि आयएनजी वैश्य बँकेच्या समभागधारकांची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोटक महिंद्रा बँकेच्या सध्या असलेल्या सहाशे शाखांची संख्या वाढून दुप्पट होणार आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=18407

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!