Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » आयकर खात्याने जाहीर केली करबुडव्यांची नावे

आयकर खात्याने जाहीर केली करबुडव्यांची नावे

income_tax_logoनवी दिल्ली, [२६ एप्रिल] – आयकर खात्याने आपल्या धोरणाचा भाग म्हणून सरकारचा १५०० कोटी रुपयांचा कर थकविणार्‍या ३१ बड्या करबुडव्यांची नावे आज वृत्तपत्रांमध्ये जाहीर केली आहेत.
करबुडव्यांची नावे जाहीर करून समाजात त्यांना लाजीरवाणे करणे, असे धोरण आयकर खात्याने स्वीकारले आहे. या करबुडव्यांनी आपला काळा पैसा कुठे जमा केला आहे, त्याचा शोध लागू शकला नाही. शिवाय, काही करबुडव्यांनी आपल्या नावावर फारच कमी संपत्ती दाखविली आहे. यामुळे त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आयकर खात्याने दिल्लीतील वृत्तपत्रांमध्ये या लोकांची नावे, त्यांचा शेवटचा पत्ता आणि त्यांच्या आर्थिक स्थितीचे विवरण प्रकाशित केले आहे.
वृत्तपत्रात ही माहिती वाचून हे करबुडवे आता नेमके कुठे आहेत, याबाबतची माहिती असल्यास सर्वसामान्य जनता ही माहिती देण्यासाठी आयकर विभागाकडे धाव घेऊ शकणार आहे आणि त्या आधारावर या करबुडव्यांचा शोध घेणे शक्य होऊ शकणार आहे. ही नावे याआधी आयकर खात्याच्या वेबसाईटवरही टाकण्यात आली होती. यात काही नावे अशी :- हैदराबाद येथील टोटेम इन्फ्रास्ट्रक्चर (४०१.६४ कोटी), पुणे येथील पाथेजा ब्रदर्स फोर्जिंग ऍण्ड ऑटो पार्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (२२४.०५ कोटी), हैदराबादेतील रॉयल फॅब्रिक्स (१५८.९४ कोटी) आणि मुंबईतील होम ट्रेड (७२.१८ कोटी).

Short URL: https://vrittabharati.in/?p=22304

Posted by on Apr 27 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1747 of 2453 articles)


=आर्थिक गुप्तचर विभागाची कारवाई= नवी दिल्ली, [२६ एप्रिल] - आर्थिक गुप्तचर विभागाने २०१३-१४ या वर्षात देशात आणि विदेशात कारवाई करून ...

×