Home » उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय » आयटी क्षेत्रात रोजगाराच्या २५ लाख संधी

आयटी क्षेत्रात रोजगाराच्या २५ लाख संधी

Information Technologyनवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] – नव्या वर्षात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला सुगीचे दिवस आले असून अधिकाधिक कंपन्या आता डिजिटायझेशनवर भर देत आहेत. त्यामुळेच आता आयटी क्षेत्रात या वर्षात २.५ लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
गेल्यावर्षी आयटी क्षेत्रात रोजगाराच्या संख्येत सरासरी १२ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, आता यंदाच्या वर्षी हीच वाढ तब्बल १४ ते १६ टक्के इतकी होण्याची शक्यता आहे. कामगारांची भरती करणारी कंपनी टीमलीझ सर्व्हिसेसच्या मते, चालू वर्षात आयटी कंपन्या डिजिटायझेशन करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. कंपन्यांकडून डिजिटायझेशनवर अधिक भर दिला जात असल्याने सुशिक्षित आणि सॉफ्टवेअर कुशल तरुणांना नियुक्त करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच आता आयटी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्टार्टअप इंडियामुळेही संधीत वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सुरू केलेल्या ‘स्टार्टअप इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून देशात आता नवीन उद्योग व नव्या कंपन्या सुरू होण्याची चिन्हे आहेत. यामुळे उद्योगांचे स्वरूप सेवा पुरवठादार असे राहिले नसून उपाय पुरवठादार (सोल्युशन प्रोव्हायडर) असे झाले आहे. या नवीन बदलासाठी आयटी क्षेत्राची देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर गरज लागणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26713

Posted by on Feb 4 2016. Filed under उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय (865 of 2453 articles)


=समरसता साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन= डॉ. आंबेडकर साहित्य नगरी (कल्याण), [३० जानेवारी] - या व्यासपीठावर जाऊ नये, यासाठी निषेध करणारे ...

×