Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » आयोजक कन्हैयाच

आयोजक कन्हैयाच

  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील भारतविरोधी घोषणा
  • पोलिसांचा हायकोर्टात दावा
  • जामिनावरील निर्णय पुन्हा लांबणीवर

delhi high-courtनवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दोन आठवड्यांपूर्वी आयोजित ज्या कार्यक्रमात भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या, त्या कार्यक्रमाचा खरा आयोजक विद्यार्थी नेता कन्हैया कुमार हाच होता आणि देशविरोधी घोषणांमध्येही तो सक्रिय होता, असा दावा दिल्ली पोलिसांनी आज बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात केला व त्याच्या कोठडीची मागणी केली.
पोलिसांनी आज कन्हैयाच्या तपासावरील १३ पानांचा स्थितीदर्शक अहवाल न्यायमूर्ती प्रतिभा राणी यांच्या न्यायालयात सादर केला. ९ फेबु्रवारी रोजी जेएनयूमध्ये भारतविरोधी घोषणा दिल्या जात असताना, त्या कार्यक्रमात अन्य विद्यार्थ्यांसोबतच काही विदेशी नागरिकही होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही साक्षीदारांची साक्ष आम्ही नोंदविली असून, त्याचा उल्लेख अहवालात आहे. कन्हैयासोबतच या घटनेचा मुख्य सूत्रधार उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य हेदेखील त्यावेळी तिथे होते, याकडेही पोलिसांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
उमर आणि अनिर्बानने आत्मसमर्पण केले असल्याने, देशद्रोहाच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेल्या कन्हैयाची कोठडी मिळावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयात केली. या नव्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाने कन्हैयाच्या जामिनावरील सुनावणी २९ फेबु्रवारीपर्यंत पुढे ढकलली.
न्या. प्रतिभा राणी यांच्या एकलपीठात सुनावणी सुरू झाल्यानंतर पोलिसांचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी उमर खालिद आणि भट्टाचार्यच्या शरणागतीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. उमर हाच या घटनेतील मुख्य सूत्रधार असून, तो पोलिसांना शरण आला असल्याने, त्याला व कन्हैयाला समोरासमोर बसवून चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे कन्हैयाची किमान १५ दिवसांची कोठडी प्राप्त करण्याचा पोलिसांना अधिकार आहे, अशी भूमिका त्यांनी विशद केली.
हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करणे आवश्यक असल्याने कन्हैयाच्या जामीन अर्जावरील निर्णय लांबणीवर टाकण्यात यावा, अशी विनंतीही तुषार मेहता यांनी केली. त्यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायाधीशांनी सुनावणी २९ पर्यंत लांबणीवर टाकली. त्याचवेळी आरोपीच्या वकिलाने पतियाळा न्यायालयातील हिंसक घटनेचा हवाला दिला. त्यावर बोलताना, न्या. प्रतिभा राणी यांनी, आरोपी कन्हैयाला आता कुठलीही इजा होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घ्यायलाच हवी, असे स्पष्ट निर्देश दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26878

Posted by on Feb 25 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (815 of 2452 articles)


=रेल्वेची क्षमता वाढविण्यावर प्रभूंचा भर= नवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] - रेल्वे मंत्री सुरेश प्रभू येत्या गुरुवारी रेल्वेचा अर्थसंकल्प संसदेत सादर ...

×