Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » आरक्षणाच्या धोरणात बदल नाही: जेटली

आरक्षणाच्या धोरणात बदल नाही: जेटली

Arun Jaitley10नवी दिल्ली, [१४ मार्च] – देशातील जातीवर आधारित आरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्यासंदर्भातील कोणताही प्रस्ताव नसून सध्याचे धोरणच कायम राहील, असे केंद्र सरकारतर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. आरक्षणासंदर्भातील धोरण हे असेच सुरू राहील, असे राज्यसभेचे नेते व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सांगितले. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाच्या खासदारांनी संसदेत आरक्षणाच्या धोरणाबाबत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर केंद्र सरकारतर्फे आरक्षणाचा पुनर्विचार होणार नसल्याचा निर्वाळा देण्यात आला.
सपाचे नेते रामगोपाल यादव यांनी सध्याचे आरक्षण धोरण बंद पाडण्याचे हे कारस्थान असल्याची टीका यावेळी केली; तर बसपा नेत्या मायावती यांनी राज्यघटनेमध्ये दलित व इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची स्पष्ट तरतूद केली असतानाही संघाने आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे, अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27320

Posted by on Mar 15 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (659 of 2453 articles)


=निमस्युलाईडचाही समावेश= नवी दिल्ली, [१४ मार्च] - आरोग्य मंत्रालयाकडून तब्बल ३४४ औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये प्रचलित औषध कंपन्यांतर्फे ...

×