Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » आरबीआय गव्हर्नरच्या अधिकारांना कात्री?

आरबीआय गव्हर्नरच्या अधिकारांना कात्री?

=पतधोरण ठरविण्यासाठी समितीचा केंद्राचा प्रस्ताव=
RBI GATEनवी दिल्ली, [२१ ऑक्टोबर] – देशाचे पतधोरण केवळ भारतीय रिझर्व्ह बँकेनेच ठरवू नये, त्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित व्हायला हवी, असे केंद्र सरकारचे स्पष्ट मत असून, याच अनुषंगाने आरबीआय गव्हर्नरच्या अधिकारांना कात्री लावण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.
सरकारने आपला हा प्रस्ताव विविध विभाग आणि मंत्रालयांकडे विचारार्थ पाठविला आहे. यात असे स्पष्टपणे नमूद आहे की, देशाचे पतधोरण ठरवणार्‍या समितीत सरकारचे चार सदस्य आणि आरबीआयचे तीन सदस्य असतील. आरबीआयचे गव्हर्नर या समितीचे अध्यक्ष असतील. त्यांच्याकडे व्हिटोचा अधिकार नसेल. मात्र, मतदानाचा अधिकार असेल. आरबीआय दोन सदस्यांची नावे समिती सुचवेल. त्यातील एक सदस्य आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आणि दुसरा बँकेचा किंवा सरकारी अधिकारी असेल. मात्र, त्यांच्याकडे मतदानाचा अधिकार नसेल.
त्याचप्रमाणे, चलनविषयक धोरण मांडताना आरबीआयला सात सदस्यीय समितीचा निर्णय मान्य करावा लागेल. निर्णय घेताना समसमान मते पडल्यास आरबीआय गव्हर्नर आपल्या मताधिकाराचा वापर करू शकतील. चलनविषयक धोरण समिती प्रमुख कर्जावरील व्याजदर आणि महागाईचे लक्ष्य निर्धारित करतील, असेही या प्रस्तावात नमूद आहे. या आधीच्या प्रस्तावात चलनविषयक धोरण ठरविणार्‍या समितीत सरकारचे जास्त सदस्य असतील, असे सुचविले होते.
आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची निवड करण्याबाबत केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्यात एकमत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. नवीन समिती प्रत्येक सहा महिन्यांनी ६ ते १८ महिन्यांकरिता महागाई दराचे लक्ष्य निर्धारित करेल आणि सहा महिन्यांनी महागाईचा अंदाज जारी करेल, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25238

Posted by on Oct 22 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1308 of 2453 articles)


हल्ल्याची भीती असल्यानेच जमविली अण्वस्त्रे पाकिस्तानने प्रथमच जाहीर कबुली इस्लामाबाद, [२१ ऑक्टोबर] - युद्ध झाल्यास भारताचे फार मोठे नुकसान करू, ...

×