Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आरोग्य मंत्रालयाकडून ३४४ औषधांवर बंदी

आरोग्य मंत्रालयाकडून ३४४ औषधांवर बंदी

=निमस्युलाईडचाही समावेश=
ministry-of-health-and-family-welfareनवी दिल्ली, [१४ मार्च] – आरोग्य मंत्रालयाकडून तब्बल ३४४ औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये प्रचलित औषध कंपन्यांतर्फे निर्मित औषधांचाही समावेश आहे. सामान्यत: मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी खोकल्यावरील औषधे, वेदनाशामके आणि प्रतिजैविकांवरही (ऍण्टिबायोटीक्स) मंत्रालयाने बंदी घातली आहे.
ही बंदी तातडीने लागू करण्यात आली असून, त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचेही मंत्रालयाने एका गॅझेटच्या माध्यमातून रविवारी कळवले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच ही बंदी लागू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या बंदीबाबत औषध उद्योग प्रश्‍नचिन उठविण्याची अथवा न्यायालयात धाव घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
अनेक विकसित देशांमध्ये कधीच बंदी घालण्यात आलेल्या निमस्युलाईड औषधाची विक्री भारतात मात्र अद्याप सुरूच होती. यामुळे अनेक तज्ज्ञांकडून वारंवार काळजी व्यक्त केली जात होती. मात्र, मंत्रालयाकडून घालण्यात आलेल्या बंदीमध्ये आता निमस्युलाईडचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय विविध ‘कॉम्बिनेशन्स’मध्ये वापरले गेलेले पॅरासिटॅमॉल, अझिथ्रोमायसिन, सिप्रोफ्लॉक्सेसिन, ओफ्लॉक्सेसिन आदींसह सुमारे ३०० औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. औषधविक्रेत्यांकडून आजवर सहजतेने विकली जाणारी अन्य अनेक वेदनाशामक औषधे व प्रतिजैविके आता डॉक्टरांच्या प्रिस्किप्शननंतरच विकणे व त्याची नोंद ठेवणे औषध विक्रेत्यांकरिता अनिवार्य करण्यात आले आहे.
बंदीनंतर तातडीने फायझर या औषध कंपनीने कोरेक्स या खोकल्यावरील औषधाचे उत्पादन व विक्री थांबवली आहे. या औषधाच्या विक्रीवर ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत कंपनीने तब्बल १७६ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र आता कंपनीला या बंदीमुळे चांगलाच फटका बसणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27317

Posted by on Mar 15 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (660 of 2453 articles)


लातूर, [१४ मार्च] - विविध कारणांवरून नेहमीच चर्चेत राहणारे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा नव्या वादात सापडले ...

×