आर्थिक विकासात भारत चीनला मागे टाकणार
Wednesday, January 21st, 2015=जागतिक नाणेनिधीचा अहवाल=
वॉशिंग्टन, [२० जानेवारी] – भारत यावर्षी ६.३ टक्के या सरासरीने आर्थिक विकास साध्य करेल आणि पुढील आर्थिक वर्षाच्या काळात भारताचा विकास दर ६.५ टक्के इतका राहील. याचाच अर्थ २०१६ मध्ये भारत आर्थिक विकासात चीनलाही मागे टाकेल, असा महत्त्वाचा अहवाल जागतिक नाणेनिधीने आज मंगळवारी दिला आहे.
नाणेनिधीने भारतातील नरेंद्र मोदी सरकारच्या ठोस पुढाकारांचे स्वागतही केले आहे. मोदी सरकार आर्थिक विकासासाठी वचनबद्ध असल्याचेच दिसून येते. पण, सरकारने आपल्या धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कारण, या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत विकासाचे सूत्र आहे, असे नाणेनिधीने म्हटले आहे.
२०१४ मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा दर ५.८ टक्के इतका होता. तिथेच, चीनने ७.४ टक्के विकास दर साध्य केला होता. २०१३ मध्येही भारताचा विकास दर पाच टक्केच होता आणि चीनने ७.८ टक्के विकास साधला होता, याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षाकरिता भारताने ६.३ टक्के विकासाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्याचप्रमाणे, पुढील वर्षासाठी भारताने ६.५ टक्के लक्ष्य ठेवले आहे. तिथेच, पुढील वर्षासाठी ६.३ टक्के इतका विकास दर ठरविला आहे. आम्हाला असे वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आर्थिक विकासाचा निर्धार अतिशय मजबूत आहे. विकासाची ही गाडी किती गतीने पुढे धावणार आहे, याकडे आमचे लक्ष लागले आहे, असे नाणेनिधीच्या संशोधन विभागाचे उपसंचालक गियान मारिया मिलेसी-फेरेट्टी यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या परिणामांबाबत आताच कुठलेही भाकीत करणे शक्य होणार नाही. कारण, सध्याच्या विकासाचे स्वरूप हे पायाभूत आहे. विकासाची ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. तथापि, या सर्व योजनांच्या अंमलबजावणीवर बरेच काही अवलंबून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=19832

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!