Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » आर्थिक विकासासाठी जगाला अतिरिक्त खांद्यांची गरज

आर्थिक विकासासाठी जगाला अतिरिक्त खांद्यांची गरज

=अरुण जेटली यांचे मत, जीएसटीला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य=
Arun-Jaitley3न्यूयॉर्क, [६ ऑक्टोबर] – जगाला आर्थिक विकासासाठी चीनशिवायही आणखी काही खांद्यांची गरज आहे. सध्या अतिशय वेगाने विकास करीत असलेल्या भारताला आपला खांदा देण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे व्यक्त केले. वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक पारित करणे हेच सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येथील कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संबोधित करताना जेटली म्हणाले की, भारताविषयी जगाच्या अपेक्षा वाढत आहेत आणि हे फार चांगले संकेत आहेत. भारताने आता असा टप्पा गाठला आहे, जिथे सहा आणि आठ टक्के विकासदरावर समाधान मानणे योग्य ठरणार नाही. नऊ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त विकास दर गाठायला हवा, असे भारतीयांना मनापासून वाटते. भारताच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारने अतिशय वेगाने हालचाली करायला हव्या, यासाठी जर सरकारवर सर्वच स्तरांवरून दबाव येत असेल, तर त्याला मला गैर असे काहीच दिसत नाही, असेही जेटली यांनी सांगितले.
जगाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी चीन हा अतिशय चांगला खांदा आहे, यात वाद नाही. पण, आता आणखी एक मजबूत खांदा भारताच्या रूपात तयार झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात हातभार लावण्याची संधी भारताला मिळाली आहे, असेही ते म्हणाले.
दादरीमुळे देशाच्या प्रतिमेला धक्का
दरम्यान, दादरीसारख्या घटनांमुळे देशाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे, असे मतही जेटली यांनी व्यक्त केले. दादरीत गोमांस खाण्याच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली, या घटनेचा मी तीव्र निषेध करतो, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24998

Posted by on Oct 7 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1378 of 2458 articles)


ऍन्जेला मार्केल, नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा सामंजस्याच्या १८ करारांवर स्वाक्षरी नवी दिल्ली, [५ ऑक्टोबर] - भारत आणि जर्मनीमधील द्विपक्षीय ...

×