Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » आर्थिक सुधारणांचा अजेंडा राबविणारच : जेटली

आर्थिक सुधारणांचा अजेंडा राबविणारच : जेटली

Arun Jaitley9ओसाका, [२ जून] – वेगाने विकास करणारी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था हा मान कायम ठेवण्यासाठी आर्थिक सुधारणांचा अजेंडा जोमाने राबविणार असून, भारताला अधिक विकसित अर्थव्यवस्थेचा देश बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) विकासाचा दर अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे ७.९ असा राहिल्यामुळे जेटली चांगलेच उत्साहित असून, त्यामुळेच त्यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे.
येत्या काही दशकांमध्ये भारताला आपल्या संपूर्ण क्षमतेचा वापर करायचा असेल तर, आर्थिक विकासाचा कार्यक्रम अधिक जोमाने राबवावा लागेल आणि चांगला विकासदर कायम ठेवल्यास गरिबी निर्मूलनासाठी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे जेटली यांनी ओसाका विद्यापीठात व्याख्यान देताना सांगितले. जगावर मंदीचे सावट असतानाही जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारताने ७.९ टक्के दराने विकास केला, तर २०१५-१६ या आर्थिक वर्षात विकासदर सरासरी ७.६ टक्के इतका आहे. विकासाला चालना देण्याच्या सरकारच्या धोरणाचाच हा परिपाक आहे, असेही जेटली यावेळी म्हणाले.
जगातील सर्वात वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था हा दर्जा टिकवून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या प्रयत्नांमध्ये आम्हाला यश आले तर भारताचा उदयोन्मुख ते विकसित अर्थव्यवस्था असा कायापालट होऊ शकतो, असा विश्‍वास जेटली यांनी व्यक्त केला. जागतिक मंदी आणि सलग दोन वर्षे मान्सूनने दगा दिल्यानंतरही भारताचा आर्थिक विकासाचा दर जगात सर्वात जास्त आहे, याकडेही जेटली यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28509

Posted by on Jun 3 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (267 of 2458 articles)


आसामात भाजपाराज आघाडीतील १० मंत्र्यांचा समावेश गुवाहाटी, [२४ मे] - आसामात आज मंगळवारी प्रथमच भाजपा सरकार पदारूढ झाले आहे. ...

×