Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » आलमविरुद्धच्या गुन्ह्यांची नव्याने चौकशी करा!

आलमविरुद्धच्या गुन्ह्यांची नव्याने चौकशी करा!

=राजनाथसिंह यांचे निर्देश=
rajnath singh3नवी दिल्ली, [१२ मार्च] – जम्मू-काश्मिरातील फुटीरतावादी नेता मसरत आलमविरुद्धच्या २७ प्रकरणांची नव्याने चौकशी करा, तसेच त्याच्या हालचालींवर देखरेख ठेवा, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी जम्मू-काश्मीर सरकारला दिले.
जम्मू-काश्मीर सरकारने मसरत आलमची सुटका केल्याच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला होता. या मुद्यावर राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मीर सरकारकडून अहवाल मागवला होता. मात्र, या अहवालाने समाधान न झाल्याने केंद्र सरकारने काही मुद्यांवर राज्य सरकारकडून आणखी स्पष्टीकरण मागवले होते. विरोधकांच्या मागणीनुसार राजनाथसिंह यांनी या मुद्यावर संसदेत निवेदनही केले होते. मात्र, या निवेदनामुळे विरोधकांचे समाधान न झाल्याने विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आपण जम्मू-काश्मीर सरकारकडून काही मुद्यांवर आणखी स्पष्टीकरण मागितले आहे. ते स्पष्टीकरण आल्यानंतर पुन्हा सभागृहात निवेदन करण्याचे आश्‍वासन राजनाथसिंह यांनी दिले होते. जम्मू-काश्मीर सरकारकडून सुधारित अहवाल आल्यामुळे राजनाथसिंह यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात पुन्हा निवेदन केले.
मसरत आलमविरुद्ध एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. जम्मू-काश्मीर सरकारने सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत त्याला २०१० पासून आठवेळा तुरुंगात डांबले होते. या कायद्यांतर्गत पहिल्यांदा सहा महिन्यांसाठी स्थानबद्ध करता येते. हा अवधी नंतर जास्तीत जास्त दोन वर्षांपर्यंत वाढविता येतो. मधल्या काळात त्याच्याविरुद्ध कोणताही नवा गुन्हा दाखल नसल्यामुळे त्याची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, त्यानुसार त्याची सुटका करण्यात आली. आता त्याला पुन्हा अटक करणे शक्य नाही, असे जम्मू काश्मीर सरकारने कळवले आहे, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. आलमला नव्याने अटक करता येणार नसली तरी त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या २७ प्रकरणांची नव्याने चौकशी करण्याची, त्याच्या सुटकेच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देता येते का, याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे तसेच त्याच्या हालचालींवर देखरेख ठेवण्याचे निर्देश जम्मू-काश्मीर सरकारला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आलमवर देखरेख ठेवताना केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांना विश्‍वासात घेण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. राजनाथसिंह यांच्या सुधारित निवेदनानेही विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. राज्यसभेत समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी तर लोकसभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी आक्षेप घेतला. मात्र, यावर चर्चा करता येणार नाही, असे निर्देश पीठासीन अध्यक्षांनी दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21317

Posted by on Mar 13 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1925 of 2452 articles)


=सुनंदा पुष्कर हत्या प्रकरण= नवी दिल्ली, [१२ मार्च] - सुनंदा पुष्कर यांच्या हत्येप्रकरणी पती शशी थरूर आणि इतरांची चौकशी केल्यानंतर ...

×