Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आवश्यक नसेल तर अनुदान घेऊ नका

आवश्यक नसेल तर अनुदान घेऊ नका

=पंतप्रधान मोदींचे पुन्हा आवाहन=
narendra-modi-budgetनवी दिल्ली, [२७ मार्च] – ज्या लोकांना सरकारी अनुदानाची खरोखरच गरज नाही, त्यांनी स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर आणि इतर गोष्टींवर सरकारकडून मिळणारे रोख अनुदान स्वत:हूनच नाकारावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी पुन्हा एकदा केले.
घरगुती वापराच्या सिलेंडरवर मिळणार्‍या सबसिडीची श्रीमंतांना काहीच गरज नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:हूनच हे अनुदान नाकारावे, असे माझे त्यांना आवाहन आहे, असे सांगताना, सध्या असलेली २७ लाख ही एलपीजी गॅस कनेक्शनची संख्या आगामी चार वर्षांत एक कोटीच्या घरात नेण्याची सरकारची योजना असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
सिलेंडरवरील रोख अनुदानाचा फायदा केवळ गरजू लोकांनाच मिळावा, यासाठी धनाढ्य लोकांना अनुदान नाकारण्याचे आवाहन यापूर्वीदेखील मी केले होते. आज या आवाहनाचा मी पुनरुच्चार करीत आहे. माझ्या आवाहनाला आतापर्यंत २.८० लाख नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे सरकारची किमान १०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. हा निधी गरिबांच्या कल्याणाकरिता वापरता येईल, असे ‘ऊर्जा संगम’ या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले.
पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सुमारे १२ कोटी बँक खात्यांमध्ये एलपीजी अनुदान थेट जमा करण्यात येत आहे. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी पारदर्शी व्यवस्थेचा फायदा होतो, हेच जनधन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतून सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. २०२२ पर्यंत ऊर्जेसाठी आयात केल्या जाणार्‍या स्रोतांवरील अवलंबन १० टक्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. २०२२ मध्ये भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करणार आहे. सध्या भारताच्या एकूण ऊर्जा स्रोतांपैकी ७७ टक्के वाटा आयात केल्या जाणार्‍या स्रोतांचा आहे. निर्यातीचा वाटा २०२२ पर्यंत आपण १० टक्क्यांनी कमी करू शकलो, तर २०३० पर्यंत हा वाटा ५० टक्क्यांनी कमी होईल, असा माझा विश्‍वास आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21761

Posted by on Mar 28 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1840 of 2453 articles)


=काळा पैसा रोखण्यासाठी जेटली यांचा सल्ला= नवी दिल्ली, [२७ मार्च] - काळ्या पैशाचे उगमस्थानच बंद करण्यासाठी नागरिकांनी धनादेश आणि कार्डस्‌चा ...

×