Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » आव्हानांचा सामना करण्यास देश सज्ज: राजनाथसिंह

आव्हानांचा सामना करण्यास देश सज्ज: राजनाथसिंह

=उच्चस्तरीय बैठकीत देशांतर्गत सुरक्षेचा आढावा=
rajnath singh3नवी दिल्ली, [७ मार्च] – पाकिस्तानमधून लष्कर-ए-तोयबाचे १० अतिरेकी गुजरातमध्ये घुसल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी एका उच्चस्तरीय बैठकीत देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. राष्ट्रीय सुरक्षेला पोहोचणार्‍या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सुरक्षा दल सज्ज असल्याचा इशारा या बैठकीतून देण्यात आला.
गृहमंत्रालयात झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी, गुप्तचर खात्याचे महासंचालक दिनेश्‍वर शर्मा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तानातून गुजरातमार्गे देशात घुसलेल्या अतिरेक्यांमुळे देशाच्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका हाणून पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशात घातपाती कारवाया घडविण्याचा या अतिरेक्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे एनएसजीची चार पथक गुजरातमध्ये पोहोचली असून, त्यांना अहमदाबाद आणि सोमनाथ येथे मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले असल्याचे या बैठकीत सांगण्यात आल्या. गुजरातमधील सुरक्षा व्यवस्थेचाही राजनाथसिंह यांनी यावेळी आढावा घेतला.
गुजरातमध्ये घुसलेल्या १० अतिरेक्यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. तथापि, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गुजरातमार्गे दहा पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसल्याची माहिती पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीरखान यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना दिली होती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा तातडीने कामाला लागल्या.
गुजरातसोबत राजधानी दिल्लीतही अतिरेकी घातपाती कारवाया घडवण्याची शक्यता असल्यामुळे राजधानी दिल्लीतही अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर यावेळी सुरक्षा यंत्रणा कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, गोवा आणि चंदीगड येथे अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27104

Posted by on Mar 7 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (739 of 2453 articles)


=काळ्या पैशावर आरबीआयचे धोरण= नवी दिल्ली, [७ मार्च] - केंद्र सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीसाठी देशाची दारे खुली केली असली, तरी ...

×