Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » आशा भोसले यांना पुत्रशोक

आशा भोसले यांना पुत्रशोक

hemant-bhosleमुंबई, [२८ सप्टेंबर] – ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पुत्र आणि प्रसिद्ध संगीतकार हेमंत भोसले यांचे स्कॉटलंडमध्ये कर्करोगावरील उपचारादरम्यान निधन झाले.
गेल्या वर्षभरापासून हेमंत भोसले कर्करोगाशी झुंजत होते. सहा-सात वर्षांपासून स्कॉटलंडमध्ये वास्तव्यास असलेल्या हेमंत यांच्यावर तिथेच उपचार सुरू होते. मात्र, रविवारी रात्री त्यांचे निधन झाले.
गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला आलेल्या बातमीमुळे मंगेशकर कुटुंबासह संगीत क्षेत्रातही शोकाकुल वातावरण पसरले आहे. काही वर्षांपूर्वी आशा भोसले यांच्या कन्या वर्षा यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले होते.
शारद सुंदर चंदेरी राती, जा जा जा रे नको बोलू, मी ही अशी मोठी कशी गं, बाळा माझ्या नीज यासारखी हेमंत भोसले यांनी संगीतबद्ध केलेली मराठी गाणी विशेष गाजली होती.
१९७० ते ८५ च्या दशकामध्ये भोसले यांनी बॉलीवूडला दिलेल्या सांगीतिक योगदानाची विशेष दखल घेण्यात आली होती. १७ हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. त्यापैकी आखरी संघर्ष, अनपढ, दामाद, धरती आकाश, नजराना प्यार का, राजा जोगी यासारख्या चित्रपटातील गाणी त्या काळात गाजली

Short URL: https://vrittabharati.in/?p=24116

Posted by on Sep 29 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1392 of 2452 articles)


=कॉंग्रेसची टीका= नवी दिल्ली, [२८ सप्टेंबर] - रविवारी फेसबुकच्या कार्यक्रमात आईचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. परंतु, ...

×