Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » आसामात भाजपाची सत्ता येणार

आसामात भाजपाची सत्ता येणार

=सी-व्होटरच्या जनमत चाचणीतील निष्कर्ष=
BJP-FLAG-RALLY-IN-UP-1नवी दिल्ली, [७ मार्च] – निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. याच अनुषंगाने विविध राजकीय पक्ष युती व आघाड्या स्थापन करण्यात व्यस्त असताना, सी-व्होटर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आसामात यावेळी भाजपाची सत्ता येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
इंडिया टीव्हीकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. केरळात सत्तेवर असलेल्या कॉंगे्रसप्रणीत युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटला यावेळी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागणार असून, या राज्यात माकपप्रणीत डाव्या लोकशाही आघाडीला सहजपणे स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंगे्रस पक्ष पुन्हा एकदा पश्‍चिम बंगालमधील आपली सत्ता कायम राखणार असल्याचेही यात दिसून आले आहे. तर, तामिळनाडूत जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्षच पुन्हा सत्तेवर येणार आहे.
सी-व्होटरने मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे सर्वेक्षण केले आहे. १४० सदस्यीय केरळ विधानसभेत मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या नेतृत्वाखालील युडीएफला यावेळी केवळ ४९ जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. तर, डाव्या आघाडीला ८९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत युडीएफने ७२ आणि डाव्या आघाडीने ६६ जागा जिंकल्या होत्या. केरळात भाजपाला केवळ एक जागा मिळेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
२९४ सदस्यीय पश्‍चिम बंगाल विधानसभेत तृणमूल कॉंगे्रसला किमान १५६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत या पक्षाने १८४ जागा जिंकल्या होत्या. तिथेच गेल्या निवडणुकीत ६० जागांवर स्थिरावलेल्या डाव्या आघाडीला यावेळी ११४ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या निवडणुकीत ४२ जागा जिंकणार्‍या कॉंगे्रसला यावेळी केवळ १३ जागांवरच समाधान मानावे लागणार आहे.
तामिळनाडूत अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात काट्याची लढत अपेक्षित आहे. २३४ सदस्यीय राज्य विधानसभेत अण्णाद्रमुकला ११६ जागा मिळण्याची शक्यता आहे. अर्थात बहुमतासाठी या पक्षाला किमान तीन जागा कमी पडणार आहेत. गेल्या निवडणुकीत या पक्षाला २०३ जागा मिळाल्या होत्या. तर सध्या ३१ सदस्य असलेल्या द्रमुकच्या जागा १०१ पयर्र्त वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
देशाचे लक्ष लागलेल्या आसामात भाजपाप्रणीत आघाडीला १२६ सदस्यीय विधानसभेत ५७ ते ६३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालील कॉंगे्रस आघाडीला केवळ ४४ जागा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत कॉंगे्रसला ७८ जागा मिळाल्या होत्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27091

Posted by on Mar 7 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (744 of 2453 articles)


सेऊल, [७ मार्च] - अमेरिका आणि दक्षिण कोरियात आज सोमवारपासून वार्षिक संयुक्त लष्करी कवायती सुरू झाल्या असतानाच, अमेरिकेवर तसेच ईशान्य ...

×