Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, बंगाल, राजकीय, राज्य, राष्ट्रीय » आसाम, केरळमध्ये कॉंग्रेसचे पानिपत

आसाम, केरळमध्ये कॉंग्रेसचे पानिपत

=अम्मा-दीदींना भरघोस यश=
jayalalitha-mamtaनवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने आसामात दणदणीत व ऐतिहासिक विजय मिळवला. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस आणि तामिळनाडूत जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने नेत्रदीपक विजयासह आपली सत्ता कायम राखली, तर केरळात डाव्या आघाडीने कॉँग्रेसप्रणीत युडीएफ आघाडीला मागे सारले. इतर चारही ठिकाणी सपाटून मार खावा लागलेल्या कॉंग्रेसला पुद्दुचेरीत मात्र द्रमुकच्या सहकार्याने निसटते बहुमत मिळविता आले.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर तासाभरातच निवडणुकीचा कल स्पष्ट झाला. आसामात भाजपाने, पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने, केरळात डाव्या आघाडीने प्रारंभी घेतलेली आघाडी कायम ठेवली. मात्र, तामिळनाडूत प्रारंभी समोर दिसणारी द्रमुक-कॉंग्रेस आघाडी तासाभरानंतर माघारली आणि अण्णाद्रमुकची आगेकूच सुरू झाली.
आसाममध्ये ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांच्या नेतृत्वात गेल्या वेळी विजयाची हॅट्‌ट्रिक करणार्‍या कॉंग्रेसला यावेळी मात्र सत्तेतून पायउतार व्हावे लागले. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे धडाडीचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वात भाजपा, आगपा आणि बोडो पीपल्स फ्रंट या आघाडीने शानदार विजय संपादन केला. १२६ सदस्यीय आसाम विधानसभेत भाजपाने ४४ जागी विजय मिळवला असून, १७ जागी आघाडी घेतली आहे. आगपाने ११ जागा जिंकल्या असून, तीन ठिकाणी पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बोडो पीपल्स फ्रंटने ९ जागी विजय मिळवून तीन ठिकाणी आघाडी घेतली आहे.
कॉंग्रेसला यावेळी फक्त २१ जागी विजय मिळाला असून, चार ठिकाणी पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बदरुद्दिन अजमल यांच्या नेतृत्वातील एआययुडीएफला ९ जागा मिळाल्या असून, चार ठिकाणी त्या पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. स्वत: बदरुद्दिन अजमल यांना मात्र दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
पश्‍चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलने २९४ सदस्यीय विधानसभेत २११ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. कॉंग्रेसला ४४, तर माकपाला २६ जागा मिळाल्या. भाजपानेही तीन जागा जिंकून प्रथमच विधानसभेत प्रवेश केला.
तामिळनाडूत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने २३२ पैकी १३३ जागा जिंकून आपली सत्ता कायम ठेवली. दर पाच वर्षांनी सत्ताबदल होण्याचा इतिहास असलेल्या तामिळनाडूत जयललितांनी एक्झिट पोल्सला खोटे ठरवत २७ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सलग दुसर्‍यांदा निवडून येण्याचा पराक्रम केला. करुणानिधी यांच्या द्रमुकला ८९ आणि कॉंग्रेसला ८ जागा मिळाल्या.
केरळातील ओमन चंडी यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेसप्रणीत युडीएफ सरकारला जनतेने साफ नाकारून डाव्या आघाडीच्या बाजूने जनादेश दिला. १४० सदस्यीय केरळ विधानसभेत डाव्या आघाडीने ८५ जागा पटकावल्या असून, युडीएफला ४६ जागा मिळाल्या.
तामिळनाडूजवळ असलेल्या पुद्दुचेरी या केंद्रशासीत प्रदेशात कॉंग्रेस-द्रमुक आघाडीने ३० पैकी १७ जागा जिंकून साधे बहुमत मिळविले. एआयएनआरसीला ८, अण्णाद्रमुकला ४ आणि इतरांना एक जागा मिळाली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28339

Posted by on May 19 2016. Filed under ठळक बातम्या, तामिळनाडू, बंगाल, राजकीय, राज्य, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, तामिळनाडू, बंगाल, राजकीय, राज्य, राष्ट्रीय (315 of 2454 articles)


=निवडणूक निकाल विकासाभिमुख= नवी दिल्ली, [१९ मे] - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे भाजपाच्या विकासाभिमुख विचारधारेवर जनतेने व्यक्त केलेल्या ...

×