Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » इंग्रजी शिका अन्यथा देश सोडा!

इंग्रजी शिका अन्यथा देश सोडा!

=पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांचा मुस्लिम महिलांना आदेश=
david-cameronलंडन, [१९ जानेवारी] – इंग्रजी शिका अन्यथा देश सोडा, असे कडक आदेश इंग्लंडमधील मुस्लिम महिलांसाठी खुद्द पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांनी जारी केले आहेत. वाढत्या दहशतवादाला रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे ब्रिटीश माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.
कॅमरून यांनी मंजूर केलेल्या नव्या व्हिसा प्रणालीनुसार आता दोन किंवा अडीच वर्षांपेक्षा जास्त दिवस इंग्लंडमध्ये राहणार्‍या मुस्लिम महिलांना इंग्रजीची चाचणी द्यावी लागेल. पतीसोबत इंग्लंडमध्ये राहणार्‍या मुस्लिम महिलांना इंग्रजी भाषेच्या चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना इंग्लंडमध्ये राहण्याचा अधिकार नसेल, असे कॅमरून म्हणाले.
सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या तब्बल १ लाख ९० हजार मुस्लिम महिलांचे इंग्रजी कच्चे आहे. या सर्व महिलांना इंग्रजी शिकविण्यासाठी सुमारे तीन कोटी अमेरिकन डॉलर खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे पतीसोबत ५ वर्षांच्या व्हिसावर इंग्लंडमध्ये येणार्‍या मुस्लिम महिलांना, अडीच वर्षांनी इंग्रजीची चाचणी द्यावी लागेल. त्यावेळी त्यांच्या इंग्रजीत किती प्रगती झाली आहे, त्यानुसार व्हिसाच्या मुदतीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कॅमरून यांनी जाहीर केले आहे.
ऑक्टोबरपासून नवे धोरण
इंग्लंड सरकारचे हे नवे धोरण याच वर्षीच्या ऑक्टोबर माहिन्यापासून लागू होणार असून, त्यानंतर पाच वर्षांच्या स्पाऊस व्हिसावर इंग्लंडमध्ये आलेल्या महिलांना इंग्रजी शिकण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी असेल. याशिवाय इंग्लंडमध्ये स्थलांतरित होत असलेल्या नागरिकांची इंग्रजी सुधारण्यासाठी क्लासेसची सोय करण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये नव्या संधी मिळवण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे, असे कॅमरून यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26591

Posted by on Jan 20 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (894 of 2458 articles)


जेरुसलेम, [१९ जानेवारी] - आर्थिक संबंध दृढ करणे भारत-इस्रायलच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय गरजेचे असून, दोन राष्ट्रांमध्ये व्यापाराशिवाय इतरही क्षेत्रात दिर्घकालीन ...

×