Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » इंग्रज व केंद्र सरकारमध्ये काहीच फरक नाही

इंग्रज व केंद्र सरकारमध्ये काहीच फरक नाही

=अण्णा हजारे यांचा आरोप=
Anna Hazareनवी दिल्ली, [२३ फेब्रुवारी] – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे धोरण शेतकर्‍यांच्या हिताचे नाही. या सरकारच्या आजवरच्या कारकीर्दीत केवळ उद्योगपतींचाच फायदा झाला आहे. इंग्रजांची हुकूमशाही आणि विद्यमान सरकारमध्ये काहीच फरक नाही, असा आरोप करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सोमवारी मोदी सरकारविरोधातील आपल्या दोन दिवसीय आंदोलनाला सुरुवात केली.
जंतरमंतर येथे पुकारलेल्या अण्णांच्या या आंदोलनात त्यांचे शेकडो समर्थक, देशभरातील २२ शेतकरी संघटना आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर सहभागी झाल्या आहेत. सरकारने भू-संपादनासाठी जो अध्यादेश जारी केला आहे, त्याचा विरोध करण्यासाठी आपण देशातील प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहोत, असे अण्णा म्हणाले.
केंद्र सरकारने भूसंपादनाबाबत जारी केलेला अध्यादेश शेतकर्‍यांच्या विरोधात आणि उद्योगपतींच्या हिताचा आहे. इंग्रजांची हुकूमशाही व नवे केंद्र सरकार यात काहीच फरक नाही. भूसंपादनावर अध्यादेश काढण्याची सरकारला काहीच गरज नव्हती. शेतकर्‍यांवर दबाव आणून त्यांच्या जमिनी हडप करणे, हा शेतकर्‍यांवर मोठा अन्याय आहे. भूसंपादन करण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. न्यायालयात दाद मागण्याचा शेतकर्‍यांचा हक्कही सरकारने हिरावला आहे. एक प्रकारची ही हुकूमशाहीच असून, सरकारने आपला अध्यादेश मागे घ्यावा, अशी मागणी अण्णांनी यावेळी केली.
मला मृत्यूची भीती नाही. समाजकार्य करताना अखेरचा श्‍वास घेईल. माझे हे आयुष्य समाजासाठीच आहे, असे सांगत आंदोलनाला पाठिंबा देणार्‍यांचे अण्णांनी आभार मानले. आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेस कार्यकर्ते माझ्या व्यासपीठापर्यंत येऊ शकत नाही. समर्थक म्हणून ते केवळ आंदोलनात सहभागी होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20857

Posted by on Feb 24 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2015 of 2453 articles)


=डॉ. मुरली मनोहर जोशींचे मत= नवी दिल्ली, [२३ फेब्रुवारी] - सर्वसामान्यांनी नियमितपणे योगाभ्यास करायलाच हवा. यामुळे पुरुष आणि महिलांमध्ये नवे ...

×