Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » इंटेलचे माजी ‘सीईओ’ अँडी ग्रूव्ह यांचे निधन

इंटेलचे माजी ‘सीईओ’ अँडी ग्रूव्ह यांचे निधन

andy grove intelसँटा क्लारा, [२२ मार्च] – संगणकाचा महत्वाचा भाग ‘मदर बोर्ड’ चिप बनविणारी जगातील सर्वात मोठी कंपनी इंटेल कॉर्पोरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी ग्रूव्ह यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते.
ग्रूव्ह यांचे निधन सोमवारी झाले असल्याचे इंटेलच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप सांगण्यात आलेले नाही. त्यांना पार्किन्सनचा आजार होता. तसेच १९९० मध्ये त्यांना ग्रंथींचा कर्करोगही झाला होता.
इंटेल कंपनीला चिप बनविणारी जगातील सर्वात मोठी कंपनी बनविण्यात ग्रूव्ह यांचा सिंहाचा वाटा आहे. ते गेली ३७ वर्ष या कंपनीत कार्यरत होते. नाझी राजवटीत लहानाचे मोठे झाल्यानंतर हंगेरीतून बाहेर पडून अमेरिकेत गेलेल्या गू्रव्ह यांनी १९८० च्या दशकात इंटेल कंपनीला दिवाळखोरीपासून वाचविले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27522

Posted by on Mar 23 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (594 of 2458 articles)


=साखर कारखाना, २९० एकर जमिनीवर टाच, ईडीची धडक कारवाई= मुंबई, [२१ मार्च] - राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात आणि महाराष्ट्रातील ...

×