Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » इंडियाचे भारत होणार?

इंडियाचे भारत होणार?

=सुप्रीम कोर्टाची केंद्र, राज्यांना नोटीस=
supreme_court_1नवी दिल्ली, [२५ एप्रिल] – ‘इंडिया’ हे नाव बदलवून या देशाला त्याच्या ‘भारत’ याच मूळ नावाने ओळखले जावे, अशी विनंती करणार्‍या जनहित याचिकेवर सुनावणी करण्याची तयारी दर्शवितानाच, सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस जारी केली आहे.
सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्या. अरुण मिश्रा यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने देशाच्या नामकरणावर उपस्थित करण्यात आलेल्या अनेक प्रश्‍नांचे परीक्षण करण्याचे ठरविले आहे. ‘इंडिया’ हे नाव बदलून या देशाचे ‘भारत’ असे नामकरण का करण्यात येऊ नये, अशी विचारणा न्यायालयाने केंद्र सरकार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली असून, शक्य तितक्या लवकर उत्तर सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
शासकीय कामकाज आणि अधिकृत पत्रव्यवहारांमध्ये ‘इंडिया’ असे नाव वापरण्यापासून सरकारला रोखण्यात यावे, अशी विनंती महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते निरंजन भटवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. केवळ सरकारलाच नव्हे, तर शासकीय संस्था आणि उद्योजकांनीही आपल्या प्रत्येक कामकाजात इंडिया नव्हे तर भारत याच नावाचा उल्लेख करावा, असे निर्देश न्यायालयाने जारी करावे, अशी विनंती करताना, संविधान सभेत या देशाचे नाव ठेवण्याची प्रक्रिया सुरू असताना भारत, हिंदुस्थान, हिंद, भारतभूमी आणि भारतवर्ष अशा अनेक नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, याकडेही याचिकाकर्त्याने न्यायालयाचे लक्ष वेधले.
भारतीय राज्य घटनेच्या कलम १ मध्ये ‘इंडिया’ शब्दाचा वापर ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९३५’ आणि ‘इंडियन इन्डिपेंडन्स ऍक्ट १९४७’ याबाबतचा संदर्भ स्पष्ट करण्यासाठीच झालेला आहे. शिवाय, या देशाचे इंडिया असे नाव ठेवणारे कोणतेही शासकीय दस्तावेज उपलब्ध नसताना, या देशाला इंडिया असे कोणत्या आधारावर संबोधले जात आहे, असा सवालही याचिकेत उपस्थित करण्यात आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22248

Posted by on Apr 26 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1753 of 2453 articles)


=अमेरिकेने भारताला मागितले स्पष्टीकरण= वॉशिंग्टन, [२५ एप्रिल] - फोर्ड फाऊंडेशन आणि ग्रीनपीस या स्वयंसेवी संस्थांवर भारताने केलल्या कारवाई प्रकरणी अमेरिकेने ...

×