Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » इंदू मिलमधील स्मारकाचे काम १४ एप्रिलनंतर सुरु

इंदू मिलमधील स्मारकाचे काम १४ एप्रिलनंतर सुरु

devendra-fadnavis7मुंबई, [२३ मार्च] – दादरमधील इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला बाबासाहेबांच्या जन्मदिनानंतर म्हणजे १४ एप्रिलनंतर लगेचच सुरुवात केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
इंदू मिलमधील स्मारकासंदर्भात राष्ट्रवादीच्या प्रकाश गजभिये यांनी बुधवारी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक विनावाद होण्यासाठी सर्वसमावेशक चर्चा आवश्यक आहे. सध्या स्मारकाच्या आराखड्यासंदर्भात काही मतभेद आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि आराखड्यासर्ंभात एकमत करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य शासनास हस्तांतरणाची औपचारिकता फक्त बाकी आहे. टीडीआर वगळून केंद्राला इंदू मिलच्या जागेसंदर्भात १४२३ कोटी राज्य शासन देणार आहे. या संदर्भात केंद्र सरकार, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात त्रिपक्षीय करार झाला असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
स्मारकाच्या विकासासाठी शासनाने यापूर्वीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे. स्मारकाच्या पुढील देखभाल व संचलनसाठी शासन स्वतंत्र प्राधिकरण नेमणार आहे. तसेच या स्मारकासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने १२५ कोटी रुपयांची तरतूद त्यांच्या अर्थसंकल्पात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहास दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27563

Posted by on Mar 26 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (576 of 2451 articles)


मुंबई, [२३ मार्च] - राज्यात सातत्याने पडत असलेल्या दुष्काळावर कायमस्वरुपी उपाय योजण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती कृषी तथा मदत व ...

×