Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य » इंद्रा नुयी यांना जागतिक लीडरशीप पुरस्कार

इंद्रा नुयी यांना जागतिक लीडरशीप पुरस्कार

Indra Nooyi, chair and CEO of PepsiCoवॉशिंग्टन, [२४ सप्टेंबर] – जगातील अग्रगण्य पेप्सिको कंपनीच्या प्रमुख इंद्रा नुयी यांना यूएस-इंडिया बिझिनेस कौन्सिलचा (युएसआयबीसी) २०१५ चा जागतिक लीडरशीप पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. जागतिक बाजारपेठेत त्यांनी केलेले उत्कृष्ट काम आणि महिला म्हणून त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका, यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्यासह एचटी ग्रुपच्या कार्याध्यक्ष शोभना भरतिया यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण सोमवारी युएसबीच्या एका आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन, परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून, या पुरस्कारामुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर अधिक चांगला परिणाम होईल, असे इंद्रा नुयी पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना म्हणाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24046

Posted by on Sep 25 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य (1411 of 2453 articles)


मुंबई, [२४ सप्टेंबर] - रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरणाच्या कामातील गैरव्यवहाराबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध अवैध ...

×