Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » इंद्रा नूयी ठरल्या येल विद्यापीठाच्या सर्वात दानशूर विद्यार्थिनी

इंद्रा नूयी ठरल्या येल विद्यापीठाच्या सर्वात दानशूर विद्यार्थिनी

=विद्यापीठाच्या डीन पदासाठीही होऊ शकते निवड=
Indra Nooyi, chair and CEO of PepsiCoन्यूयॉर्क, [१३ जानेवारी] – अमेरिकेतील नामांकित येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या डीनपदी पेप्सिको व्यवसाय समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भारतीय वंशाच्या इंद्रा नूयी विराजमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येलच्या माजी विद्यार्थिनी नूयी यांनी नुकतीच विद्यापीठाला भलीमोठी रक्कम देणगीस्वरूपात दिल्याने विद्यापीठानेही त्यांना सर्वाधिक दानशूर माजी विद्यार्थिनी, असा किताब अभिमानाने बहाल केला आहे.
६० वर्षीय नूयी यांनी देणगीस्वरूपात नेमकी किती रक्कम दिली याचा खुलासा येलने केला नसला तरीही विद्यापीठाला अशाप्रकारे मोठ्या रकमेची देणगी देणार्‍या त्या पहिल्याच महिला असल्याचे सांगितले जात आहे.
पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांनी १९८० साली येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून पदवी घेतली. येलमधील अनुभवाने माझ्या जीवनाला नवी दिशा मिळाली, या विद्यापीठाने मला जे दिले आहे त्या तुलनेत मी दिलेली देणगीस्वरूपातील भेट फारच छोटी आहे. येलने नेतृत्वाबाबत आपल्याला व्यापक दृष्टिकोन दिला. याशिवाय उद्योगव्यवसाय आणि समाजादरम्यानच्या सामायिक बिंदूची जाणीवही माझ्यात निर्माण केली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नूयी यांच्या भगिनी आणि ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या संगीतकार चंद्रिका टंडन आणि त्यांचे पती रंजन यांनी १०० दशलक्ष डॉलरची देणगी न्यूयॉर्क अभियांत्रिकी विद्यापीठाला देत भारत-अमेरिका समुहातील सर्वात मोठी परोपकारी भेट देणारी व्यक्ती म्हणून ओळख मिळवली होती. अशाच प्रकारे २०१० मध्ये हॉर्वर्ड बिझनेस स्कूलला टाटा उद्योग समूहाने ५० दशलक्ष डॉलरची देणगी दिली होती.
‘‘देणगीतून दिला नव्या पिढीला संदेश- इंद्रा नूयी
उद्योगधंद्यातील प्रश्‍न हे केवळ तेवढेच मर्यादित नसतात. त्यापलिकडे जाऊन विचार करता आला पाहिजे. भविष्यात त्याच कंपन्या टिकतील ज्या पैशांपलीकडे जाऊन समाजासाठी काही भरीव कामगिरी करतील, हाच संदेश मला माझ्या या कृतीतून नव्या पिढीला द्यायचा आहे.’’

Short URL: https://vrittabharati.in/?p=26504

Posted by on Jan 14 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (921 of 2458 articles)


=मनोहर पर्रीकर यांची माहिती= नवी दिल्ली, [१२ जानेवारी] - संरक्षण आणि शस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी संरक्षण खरेदी परिषदेच्या सोमवारी ...

×