Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » इतिहासावर छाप सोडण्यास मोदी उत्सुक

इतिहासावर छाप सोडण्यास मोदी उत्सुक

=टाईमचे मत=
narendra_modi11न्यूयॉर्क, [१७ एप्रिल] – भारत आणि चीनमध्ये अतिशय सक्षम आणि प्रभावी नेत्यांची सत्ता आहे. हे दोन्ही नेते विशेषत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इतिहासावर आपली छाप सोडण्यास उत्सुक आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांची एक दशकाची मवाळ सत्ता संपुष्टात आल्यानंतर नरेंद्र मोदी थेट फ्रंटफूटवर येऊन धडाक्यात भारताचे नेतृत्व करीत आहेत, असे गौरवोद्‌गार जागतिक ख्यातिप्राप्त टाईम पाक्षिकाने आपल्या ताज्या अंकात काढले आहे.
टाईमने अलीकडेच पंतप्रधान मोदी यांचा जगातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींमध्ये समावेश केला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही गुरुवारी मोदी यांचे ‘रिफॉर्मर ऑफ चीफ’ या शब्दात याच पाक्षिकातील एका लेखात वर्णन केले आहे. त्यात आता स्वत: टाईमने एका विशेष लेखात मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.
आशिया उपखंडातील काही देशांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून प्रभावी नेतृत्वच नव्हते. पण, आता भारत आणि चीनला अतिशय कणखर नेतृत्व लाभले आहे. या दोन्ही देशांकडे जे प्रभावशाली नेतृत्व आहे, त्याची तुलना जगात इतर कुणासोबतही करता येणार नाही. चीनमध्ये २००२ ते २०१२ या दशकात हु जिंताओ यांची सत्ता होती. पण, ती इतकी प्रभावी नव्हती. जिंताओ यांच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असले, तरी त्यांनी ते स्वबळावर घेतले नव्हते, तर सत्तारूढ आघाडीतील अन्य घटक पक्षांचे आणि स्वत:च्या कम्युनिस्ट पार्टीतील वरिष्ठ नेत्यांचे मत विचारात घेऊनच त्यांनी बहुतांश निर्णय घेतले होते.
भारतातही माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकारचे सलग दहा वर्षे नेतृत्व केले असले, तरी त्यांचा कार्यकाळही निराशाजनकच राहिला. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी जेव्हा नेतृत्व सोडले, त्यावेळी भारताची स्थिती फारच चिंताजनक होती. मात्र, आता या दोन्ही देशांमध्ये सत्तांतर झाले आणि सत्तेची सूत्रे अतिशय प्रभावशाली व्यक्तींच्या हातात आली आहेत, असे सांगताना टाईमने आपल्या लेखात गेल्या वर्षी मॅडिसन स्क्वेअर येथे मोदी यांच्या जाहीर सभेचा आवर्जून उल्लेख केला आहे. अनेक जागतिक नेत्यांना विदेशी भूमीत इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आजवर कधीच मिळाली नव्हती. पण, मोदी यांनी ही किमया सहज साध्य केली आहे. भारतातील आजवरच्या पंतप्रधानांना जे शक्य झाले नाही, ते मोदी यांनी साध्य केले आहे. थेट फ्रंटफूटवर येऊनच ते देशाचे नेतृत्व करीत आहेत, असेही त्यात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22168

Posted by on Apr 18 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1776 of 2458 articles)


=पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन= ओट्टावा, [१७ एप्रिल] - तीन दिवसांच्या कॅनडा दौर्‍यातील आपल्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ...

×