Home » उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय » इन्फोसिसने आठ हजारावर कर्मचार्‍यांना काढले

इन्फोसिसने आठ हजारावर कर्मचार्‍यांना काढले

बंगळुरू, [२० जानेवारी] – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिनने कर्मचारी-कपातीची कुर्‍हाड उगारताना आठ हजारावर कर्मचार्‍यांना एका झटक्यात घरी बसविले.
गेल्या एक वर्षापासूनच इन्फोसिसने कर्मचार्‍यांची कपात करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत आठ हजारापेक्षा जास्त कर्मचार्‍यांना आम्ही कमी केले आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य मनुष्य बळ व्यवस्थापक कृष्णमूर्ती शंकर यांनी दिली.
गेल्या एक वर्षाच्या काळात आम्ही टप्प्याटप्प्याने कर्मचार्‍यांची कपात केल आहे. प्रत्येक टप्प्यात दोन हजार कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कर्मचारी कपातीचे पाच टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. आमच्याकडून काढण्यात येत असलेल्या कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार नाही, याची काळजी घेताना आम्ही त्यांना नवीन ठिकाणी काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षणही देण्यात येत आहे, असे कृष्णमूर्ती यांनी सांगितले.
२०१५ मध्ये कंपनीचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारणारे कृष्णमूर्ती यांनी ऑटोमेशनमुळे कामावरील माणसांची संख्या कमी होत असल्याचे कारण पुढे केले आहे. कर्मचारी कपात सुरू असली, तरी त्यांच्या ठिकाणी नवीन कर्मचार्‍यांची भरती करण्याची कंपनीची योजना नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी २५०० कर्मचारी घरी जाणार
आगामी काही दिवसांतच आणखी सुमारे २५०० कर्मचार्‍यांना घरी बसविण्यात येणार आहे, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. मागील वर्षी ऑटोमेशनमुळेच सुमारे १७ हजार कर्मचार्‍यांना कमी करण्यात आले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29392

Posted by on Jan 21 2017. Filed under उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय (73 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२० जानेवारी] - बराक ओबामा यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ आज शुक्रवारी संपला असल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ...

×