|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.18° C

कमाल तापमान : 27.72° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 73 %

वायू वेग : 2.04 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.72° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.98°C - 28.39°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.57°C - 28.93°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.48°C - 28.86°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

26.13°C - 28.12°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.81°C - 27.96°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

26.05°C - 28.43°C

sky is clear
Home » ठळक बातम्या » इन्फोसिस अमेरिकेत देणार रोजगार

इन्फोसिस अमेरिकेत देणार रोजगार

infosysनवी दिल्ली, [१० नोव्हेंबर] – सॉफ्टवेअर क्षेत्रात जगात दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसने अमेरिकेत २१०० पेक्षा जास्त तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या नव्या नियुक्त्यांमुळे डिजिटल, ऍनेलिटिक्स आणि क्लाऊड यासह इतर क्षेत्रातही इन्फोसिसची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. अमेरिकेतील आपला व्यवसाय वाढविण्यासोबतच कंपनीची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने इन्फोसिसने हा निर्णय घेतला आहे, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले. नवीन भरती करण्यात आल्यानंतर स्थानिक बाजारपेठांमधील ग्राहकांचा कल, तांत्रिक कौशल्य आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींवर लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार आहे. कंपनीच्या मते, १५०० जणांना याच आर्थिक वर्षात सल्लामसलत, विक्री, पुरवठा यासाठी वेगवेगळ्या पदांवर नियुक्त करण्यात येणार आहे, तर पुढील १२ महिन्यात अमेरिकन विश्‍वविद्यालयातील जवळपास ६०० पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना नियुक्त करण्यात येणार आहे.
सध्या इन्फोसिसमध्ये १.६५ लाखापेक्षा अधिक कर्मचारी आहेत आणि या कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ६०.८ टक्के उत्पन्न उत्तर अमेरिकेतून मिळाले. सप्टेंबर महिन्यात जाहीर झालेल्या अहवालानुसार, कंपनीचे तिमाही उत्पन्न १३,३४२ कोटी रुपये इतके आहे.

Posted by : | on : 11 Nov 2014
Filed under : ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g