Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » इम्रान खान-बेनझीरचे प्रेमसंबंध होते

इम्रान खान-बेनझीरचे प्रेमसंबंध होते

=एका पुस्तकातील खळबळजनक दावा=
Imran-benazirनवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] – पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि तहरिक-ए-इन्साफ या राजकीय पक्षाचा सर्वेसर्वा इम्रान खान यांच्यातील व्यक्तिगत संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. इम्रान आणि बेनझीर यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंधही आले होते, असा दावा एका नव्या पुस्तकात करण्यात आला आहे.
क्रिस्तोफर सॅण्डफोर्ड या लेखनाने इम्रानच्या जीवनावर आधारित एक पुस्तक लिहिले आहे. यात त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात बेनझीर भुट्टो आणि त्यांच्यासोबत शिकणारे इम्रान खान यांच्या प्रेमसंबंध होते आणि पुढे या संबंधांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, असा उल्लेख केला आहे.
बेनझीरसोबरच्या प्रेमसंबंधाबाबत इम्रान खान अतिशय भावूक होता. त्याने आपल्या आई-वडिलांसोबतही बेनझीरची भेट घालून दिली होती. पण, राजकीय आणि कौटुंबिक दबावामुळे इम्रानशी दूर होण्याचा निर्णय बेनझीरने घेतला होता. त्यानंतर दोघांमध्ये निर्माण झालेले शत्रूत्व अखेरपर्यंत कायम राहिले होते, असा दावाही लेखकाने केला आहे.
लेखक सॅण्डफोर्ड यांनी आपल्या पुस्तकासाठी इम्रान आणि त्याची घटस्फोटित पत्नी जेमिमा या दोघांचीही मुलाखत घेतली होती. त्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. इम्रान आणि बेनझीर यांचे संबंध पुढे कायम का राहिले नाही, याचे उत्तरही या पुस्तकात दिले आहे. इम्रान थोडा रसिक स्वभावाचा असल्याने बेनझीर त्याच्यासोबत राहिली नाही, असे इम्रानच्या एका मित्राने लेखकाला सांगितले होते. दरम्यान, इम्रानने बेनझीरसोबत आपले कुठलेही प्रेमसंबंध कधीच नव्हते, असा दावा करीत, या पुस्कतातील आरोपाचे खंडन केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25364

Posted by on Oct 28 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1274 of 2458 articles)


मुंबई, [२७ ऑक्टोबर] - जास्त अंतर असलेल्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण चार्ट आता चार तास आधीच लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तिकिटांबाबतची ...

×