इराकवरील आक्रमण ही चूकच
Monday, October 26th, 2015- इसिसच्या जन्मासाठी आम्हीच कारणीभूत
- टोनी ब्लेअर यांची प्रथमच जाहीर माफी
लंडन, [२५ ऑक्टोबर] – इराकवर युद्ध लादणे ही आमची फार मोठी चूक होती. इराकवरील आक्रमणामुळेच इसिससारख्या जहाल आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा जन्म झाला, अशी प्रथमच जाहीरपणे कबुली देतानाच ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी यासाठी जाहीर माफीही मागितली.
सीएनएन या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ब्लेअर म्हणाले की, २००३ मध्ये सद्दाम हुसैन यांची सत्ता उलथून लावण्यासाठी गुप्तचर संस्थांच्या अहवालाच्या आधारे आम्ही जो निर्णय घेतला, तो चुकीचाच होता, याशिवाय या आक्रमणाच्या तयारीतही आम्ही अनेक मोठ्या चुका केल्या, ही बाब आज मी मान्य करतो.
आज रविवारी ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. अमेरिकेतील राजकीय तज्ज्ञ फरीद झकारिया यांनी ब्लेअर यांची मुलाखत घेतली. इराणमधून सद्दाम हुसैन यांची सत्ता पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतरही महासंहारक शस्त्रांचा शोध घेण्यात अमेरिकेच्या नेतृत्वातील मित्रराष्ट्रांच्या फौजांना अपयश आले, याविषयी तुम्हाला काय सांगायचे आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
ज्या महासंहारक शस्त्रांचा शोध घेण्यासाठी तुम्ही इराकवर आक्रमण केले, ती शस्त्रे कुठेही मिळाली नसल्याने इराक युद्ध इतिहासातील फार मोठी चूक होती, असे तुम्हाला वाटते का, या प्रश्नात ते म्हणाले की, गुप्तचर संस्थांकडून आम्हाला जी माहिती मिळाली, ती चुकीची सिद्ध झाली, हे मी जाहीरपणे मान्य करतो आणि त्यासाठी जगाची माफीही मागतो. युद्धाच्या योजनेतही काही चुका झाल्या. सद्दाम हुसैन यांची सत्ता संपुष्टात आणल्यानंतर आम्ही जेव्हा इराक सोडू तेव्हा काय होईल, हा विचारदेखील आम्ही त्यावेळी केला नव्हता. या चुका जर आम्ही केल्या नसत्या, तर आज इसिससारख्या कू्रर दहशतवादी संघटनेचा जन्मच झाला नसता.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25328

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!