Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » इशरतची फाईल माझ्याकडे आलीच नाही

इशरतची फाईल माझ्याकडे आलीच नाही

=सुशीलकुमार शिंदेंनी हात झटकले=
SHINDEनवी दिल्ली, [४ मार्च] – २००४ साली अहमदाबादजवळील चकमकीत ठार झालेल्या इशरत जहॉंचे लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे गृह मंत्रालयाने मान्य केले होते, हा एनआयएचे अधिकारी लोकनाथ बेहरा यांचा दावा माजी केंद्रीय गृहमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी फेटाळून लावला आहे.
‘लोकनाथ बेहरा हे कनिष्ठ दजार्च अधिकारी होते आणि मी त्यांच्याशी कधीही बोललो नाही. आमची चर्चा फक्त एनआयएच्या महासंचालकांशी व्हायची. इशरतची फाईल कधीही माझ्याकडे आली नाही आणि हे आरोप निराधार आहेत’, असे सांगून शिंदे यांनी हात झटकले. पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन अतिरेकी डेव्हिल कोलमन हेडलीचा तपास करण्यासाठी गठित केलेल्या एनआयएच्या पथकाबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही. एनआयएने स्वत:हूनच हे पाऊल उचलले आणि कोणतीही गोष्ट माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
२०१० मध्ये हेडलीच्या अमेरिकेत करण्यात आलेल्या चौकशीत इशरत जहॉं तोयबाशी संबंधित असल्याचे त्याने मान्य केले होते, असा दावा पूर्वी एनआयएमध्ये काम केलेले केरळ तुकडीचे आयपीएस अधिकारी लोकनाथ बेहरा यांनी केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27006

Posted by on Mar 5 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (774 of 2453 articles)


=चीनची घोषणा= बीजिंग, [४ मार्च] - दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेसोबत सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीच्या संरक्षण अंदाजपत्रकात ७ ते ...

×