Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » इशरतच्या फाईलमध्ये थोडा बदल केला होता

इशरतच्या फाईलमध्ये थोडा बदल केला होता

=चिदम्बरम् यांची कबुली=
P. CHIDAMBARAMमुंबई, [१५ मार्च] – लष्कर-ए-तोयबाची मानवी बॉम्ब असलेली इशरत जहॉंबाबत गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या शपथपत्रात आपण काही ठिकाणी किरकोळ बदल केले होते. पण, एक वकील म्हणून भाषेतील गुणवत्ता सुधारण्यासाठीच ते बदल होते, अशी कबुली माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम् यांनी आज मंगळवारी दिली.
मुंबईत एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात चिदंबरम् बोलत होते. पहिल्या प्रतिज्ञापत्रात चुकीचा अर्थ लावण्यात आला होता. गुप्तचर विभाग केवळ गोपनीय माहिती राज्य सरकारला उपलब्ध करीत असते. गुप्त माहिती म्हणजे ठोस पुरावा नसतो. तपास यंत्रणांना त्या संदर्भातील पुरावे गोळा करून न्यायालयात सादर करावे लागतात, असे स्पष्ट करताना दुसरे प्रतिज्ञापत्र महाधिवक्त्यांनी प्रमाणित केले आहे. दुसर्‍या प्रतिज्ञापत्रातील कोणताही भाग चुकीचा नव्हता. पण, एक वकील या नात्याने प्रतिज्ञापत्रात किरकोळ दुरुस्त्या केल्या होत्या. वकिलांची ती सवयच असते, असे त्यांनी सांगितले.
तत्कालिन गृह सचिव जी. के. पिल्लई यांनी इशरतशी संबंधित फाईल्स तीनवेळा पाहिल्या होत्या, याकडे लक्ष वेधताना, पिल्लई खोटे बोलत आहेत, हे सिद्ध करणारी कागदपत्रे अचानकच कशी गहाळ झाली, असा सवालही त्यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27340

Posted by on Mar 16 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (653 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१५ मार्च] - सर्दी आणि डोकेदुखी सारख्या आजारावर लवकर बरे वाटावे म्हणून नेहमी घेण्यात येणारे औषध ‘विक्स ऍक्शन ...

×