Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » इशरतला शहीद म्हणणार्‍यांनी देशाची माफी मागावी : भाजपा

इशरतला शहीद म्हणणार्‍यांनी देशाची माफी मागावी : भाजपा

mukhtar-abbas-naqvi01नवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] – इशरत जहांला शहीद म्हणणार्‍यांनी आता देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी केली.
गुजरातमध्ये २००४ मध्ये झालेल्या चकमकीवरून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले होते. याच लोकांनी त्यावेळी इशरतला शहीद ठरविले होते. आता मात्र, मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयात हेडलीने दिलेल्या साक्षीत ती लष्करची आत्मघाती हल्लेखोर असल्याचा धक्कादायक खुलासा केला. त्यानंतर इशरत प्रकरणावरून भाजपाने विरोधकांवर टीकास्त्र सोडले. इशरतला शहीद म्हणणार्‍या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता माफी मागावी, अशी मागणीही नकवी यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस : डेव्हिड हेडलीच्या साक्षीवर संशय व्यक्त करणे म्हणजे राष्ट्रद्रोह असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. हेडलीने दहशतवादातील पाकिस्तानचा सहभाग उघड केला आहे. हेडलीवर संशय घेतला तर त्याचा थेट फायदा पाकिस्तानला होईल. राजकीय स्वार्थातून असा संशय व्यक्त करणे अयोग्य असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
शहनवाज हुसैन : इशरतला ‘बिहारकी बेटी’ व तिच्या कुटुंबीयांचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे म्हणणार्‍या मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा नेते शहनवाज हुसैन व गिरीराजसिंह यांनी केली आहे.
मीम अफजल : इशरतचे नाव घेणार्‍या हेडलीच्या साक्षीवर गोलमाल बोलत, असे एन्काऊंटर कोणाचेही होऊ शकते. ते चुकीचे आहे, असे कॉंग्रेस नेते अफजल यांनी म्हटले आहे.
राजीव रंजन : इशरतप्रकरणी आपल्या नेत्यांच्या यापूर्वीच्या भूमिकेचे खंडन न करता तपास यंत्रणा ज्यांच्या हाती आहे, त्यांनी सखोल चौकशी करून सत्य समारे आणण्याची मागणी जदयुचे राजीव रंजन यांनी केली आहे.
आव्हाड यांचा वेगळाच सूर
इशरतविरोधात हेडलीची गुरुवारची साक्ष वदवून घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. ऍड. उज्ज्वल निकम यांनी विचारलेले प्रश्‍न आणि हेडलीने दिलेली उत्तरे, ही फारच विसंगत आहेत, असा वेगळाच सूर आव्हाड यांनी आळवला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26823

Posted by on Feb 12 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (832 of 2453 articles)


नवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] - काश्मीरच्या स्वातंत्र्यापर्यंत लढू, असे म्हणत ‘हमें चाहिये आझादी, हर हाल में चाहिये आझादी, भारत की ...

×