Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » इशरतवरील गोपनीय माहिती संपुआने लपवली होती

इशरतवरील गोपनीय माहिती संपुआने लपवली होती

=आयबीच्या माजी अधिकार्‍याचा दावा=
Former IB Special Director Rajinder Kumarनवी दिल्ली, [१३ फेब्रुवारी] – पाकधार्जिण्या लष्कर-ए-तोयबाची महिला बॉम्ब असलेल्या इशरत जहॉंविषयी पूर्वीच्या संपुआ सरकारला परिपूर्ण माहिती असतानाही, तिच्याबाबतचा गोपनीय अहवाल या सरकारने दाबून ठेवला होता, असा खळबळजनक दावा इंटॅलिजन्स ब्युरोचे (आयबी) माजी विशेष संचालक राजेंद्र कुमार यांनी केला आहे.
इशरत जहॉं कोण आहे आणि ती गुजरातकडे कोणत्या उद्देशाने जात आहे, याची संपूर्ण माहिती संपुआ सरकारला होती. मी स्वत: सरकारला याबाबतचा गुप्त अहवाल दिला होता. पण, सरकारने मला बढती देण्याचे आमिष दाखविले आणि मला गप्प केले होते, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आणि मुंबई हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हीड हेडलीनेही इशरत ही मानवी बॉम्ब होती, असा खुलासा दोन दिवसांपूर्वीच केला आहे.
अतिरेकी हल्ल्याच्या धोक्याबाबतची माहिती पोलिसांना उपलब्ध करून देणे, हेच आयबीचे काम आहे. इशरतबाबत आम्हाला जी काही माहिती मिळाली होती, ती आम्ही गुजरात पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिस आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीशी आमचा काहीच संबंध नाही. इशरत आणि तोयबाचे अन्य अतिरेकी गुजरातसह देशाच्या अन्य भागांत मोठा घातपात घडविण्यासाठी येत आहेत, असे मी आपल्या गोपनीय अहवालात स्पष्टपणे नमूद केले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
इशरत आणि तिच्या साथीदारांच्या कारवायांबाबत मी एक शपथपत्रही केंद्राकडे सादर केले होते. त्यावर मुकेश मित्तल यांची स्वाक्षरी होती. पण, सरकारने या शपथपत्रात बराच बदल केला होता. या नव्या शपथपत्रावर पी. चिदम्बरम् यांनी स्वाक्षरी केली होती. हा कटाचा एक भागच होता. शासकीय व्यवस्थेचा गैरवापर झाला होता. सरकारला जे हवे होते, तेच त्यात लिहिण्यात आले होते. गृहमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे यांची त्यावर स्वाक्षरी असायला हवी होती. पण, आपले नाव पुढे यायला नको, अशी शिंदेंची भूमिका होती, असा आरोपही त्यांनी केला. गुजरात पोलिसांची कारवाई एक चकमक नसून, दहशतवादविरोधी कारवाई होती, असा दावाही त्यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26840

Posted by on Feb 14 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (825 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१३ फेब्रुवारी] - संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरू याला फाशी दिल्याच्या निषेधार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणार्‍या ...

×