Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » इशरत जहां तोयबाची आत्मघाती हल्लेखोर होती

इशरत जहां तोयबाची आत्मघाती हल्लेखोर होती

=डेव्हिड हेडलीच्या कबुलीजबाबाने खळबळ=
David_Headley Ishrat jahanमुंबई, [११ फेब्रुवारी] – गुजरातमध्ये २००४ साली पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली इशरत जहां ही युवती दहशतवादीच होती. ती लष्कर ए तोयबा या पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनेची आत्मघाती हल्लेखोर होती, असे मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडली याने आज आपल्या साक्षीत सांगितले. याआधीही त्याने इशरत जहां अतिरेकी असल्याचा उल्लेख अन्य एका साक्षीत केला होता. तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातमधील अक्षरधाम मंदिर हे इशरतचे लक्ष्य होते, अशी माहितीही हेडलीने दिली.
आज चौथ्याही दिवशी हेडलीने गौप्यस्फोटांची मालिका कायम ठेवली. काही तांत्रिक कारणामुळे बुधवारी तिसर्‍या दिवशी त्याची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची साक्ष होऊ शकली नव्हती. ती गुरुवारी येथील मोक्का न्यायालयात न्या. जी. ए. सानप यांच्या समोर पुन्हा पुढे सुरळीतपणे सुरू झाली.
यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या समक्ष, इशरत जहां ही लष्कर ए तोयबाची हस्तक होती, याचा पुनरुच्चार हेडलीने आज गुरुवारच्या साक्षीदरम्यान केला. याआधी हेडलीने अमेरिकेतील तपास यंत्रणांसमोर याबाबतची कबुली दिली होती. मात्र आता भारतातील न्यायालयातही त्याने पुनरुच्चार केल्याने, ही साक्ष महत्त्वाची मानली जात आहे.
इशरत जहां ही ठाण्याजवळच्या मुंब्रा परिसरातील रहिवाशी होती. गुजरातमध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत तिचा मृत्यू झाला होता. त्यावरून धर्मनिरपेक्षतेच्या बाता करणार्‍यांनी देशभरात मोठे वादळ उठवले होते.
आपल्या साक्षीदरम्यान इशरत जहां ही लष्करच्या महिला विंगमध्ये होती, अशी कबुली हेडलीने दिल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
ऑपरेशन बूस्टमध्ये इशरत जहांसोबत लष्करमधील आणखी एका पुरुष सदस्याचा सहभाग होता. त्यांचा पोलिसांवर हल्ला करण्याचा कट होता. पण तो कट त्यावेळेस फसला. अयोध्येतील बदला घेण्यासाठी अक्षरधाम हे इशरत जहांचे लक्ष्य होते, असेही हेडली यावेळी म्हणाला.
हेडलीने आपल्या साक्षीत, इशरत जहा ही लष्करच्या महिला विंगची आत्मघाती हल्लेखोर होती. बाबरी मशिदी विध्वंसाचा बदला घेण्यासाठी अक्षरधाम आणि देशातील महत्त्वाची मंदिरे आमचे लक्ष्य होते. तसेच अक्षरधामवरील हल्ला लष्करनेच लष्करचा म्होरक्या मुझम्मील भट याच्या मदतीने घडवून आणला. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय महाराष्ट्र आणि गुजरातही लष्करचे लक्ष्य होते.
आम्हाला आयएसआयने वेळोवेळी आर्थिक मदत केली होती. भारतात आल्यावर रिझर्व्ह बँकेकडे बिझनेस अकाऊंट सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. पण रिझर्व्ह बँकेने तो अर्ज फेटाळल्याचेही हेडलीने सांगितले. मुंबईत कार्यालय थाटून तेथूनच काही व्हिसांसाठी अर्ज करण्यात आला होता. पण ते अर्ज स्वीकारले गेले नाही. आयएसआयने देण्यात आलेल्या पैशांमध्ये भारतीय चलनातील बनावट नोटाही पाठवण्यात आल्या होत्या, अशी चक्रावून सोडणारी माहितीही डेव्हिड हेडलीने गुरुवारी आपल्या साक्षीत दिली. गुजरात पोलिसांच्या दाव्याला दुजोरा : हेडलीच्या इशरतसंबंधी यापूर्वी केलेल्या दाव्यामुळे गुजरात पोलिस आणि केंद्राच्या दाव्याला दुजोरा मिळाला होता. इशरतच्या कुटुंबाचा दावा होता की, इशरत एक विद्यार्थिनी होती. कुटुंबाने यासंबंधी कोर्टात अपीलही केले आहे. दुसरीकडे, गुजरात पोलिसांनी सांगितले होते की, अहमदाबादमध्ये चकमकीत मारले गेलेले दहशतवादी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आले होते. गुजरात पोलिसांच्या या दाव्याला आज, गुरुवारी हेडलीने दिलेल्या साक्षीने बळ मिळाले आहे. एवढेच नव्हे तर धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणार्‍यांची तोंडेही बंद झाली आहे.
मेजर इक्बाल व तहव्वूर राणाचेही घेतले नाव
सप्टेंबर २००६ मध्ये भारतामध्ये येण्यापूर्वी मेजर इक्बालने आपल्याला २५ हजार डॉलर्स दिले होते, अशी माहिती सांगत, आपले लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याची माहिती तहव्वूर राणाला होती. तसेच या दहशतवादी संघटनेसाठी आपण गुप्त माहिती गोळा करत असल्याची माहिती तहव्वूर राणाला असल्याचेही हेडलीने साक्षीत सांगितले. २६/११ च्या हल्ल्यापूर्वी तहव्वूर राणा मुंबईत आला होता, मी त्याला भारत सोडून जाण्याचा सल्ला दिला होता, असेही हेडली म्हणाला.
कराचीतून कहफा देत होता निर्देश
२६/११ रोजी लष्करचा सर्वेसर्वा अबू कहफा हा कराचीत स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षात बसून मुंबईवर हल्ला करण्यासाठी घुसलेल्या अजमल कसाबसह दहा अतिरेक्यांना निर्देश देत होता, असेही हेडलीने यावेळी सांगितले.
अभ्यास करावा लागेल : आव्हाड
डेव्हिड हेडलीने नोंदवलेल्या साक्षीनंतर मुंब्राचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार असलेले जितेंद्र आव्हाड यांनी आता सावध पवित्रा घेतला असून, हेडली नेमके काय म्हणाला हे जाणून घेण्यासाठी अभ्यास करावा लागेल, असे मत व्यक्त केले
आहे.
माझी मुलगी अतिरेकी नाही : शामिरा कौशर
हेडली आपल्या साक्षीत खोटा बोलत असून आपली मुलगी अतिरेकी नसून ती निर्दोष असल्याची प्रतिक्रिया इशरतची आई शामिरा कौशर हिने व्यक्त केली आहे. एसआयटी व सीबीआयच्या सर्व चौकशी अहवालात तिला निर्दोष दाखवण्यात आले. त्यामुळेच आम्ही न्यायालयात धाव घेण्याचा विचार करीत असल्याचेही कौशर हिने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26825

Posted by on Feb 12 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (831 of 2453 articles)


नवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] - इशरत जहांला शहीद म्हणणार्‍यांनी आता देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेते मुख्तार अब्बास नकवी ...

×