Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » इशरत जहॉं तोयबाचीच मानवी बॉम्ब

इशरत जहॉं तोयबाचीच मानवी बॉम्ब

=डेव्हिड हेडलीचा खुलासा=
David_Headley Ishrat jahanनवी दिल्ली, [११ डिसेंबर] – गुजरातच्या अहमदाबादजवळ पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली इशरत जहॉं ही तरुणी पाकधार्जिण्या लष्कर-ए-तोयबाचीच मानवी बॉम्ब होती, असा स्पष्ट खुलासा मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हिड हेडलीने केला आहे. इशरत आणि तिच्या साथीदारांना सभ्य विद्यार्थिनी संबोधून नरेंद्र मोदी यांच्या तत्कालीन गुजरात सरकारवर टीकेची झोड उठविणारे तथाकथित धर्मनिरपेक्ष विचारवंत व राजकीय नेते यामुळे चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा संस्था अर्थात एनआयएचे एक पथक अलीकडेच शिकागोला गेले होते. त्यावेळी हेडलीने या पथकासमोर इशरतविषयीचे वास्तव उघड केले. ती तोयबाची जहाल सदस्य होती. विशेष म्हणजे, ही चकमक बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. सोबतच, गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह आणि राज्य पोलिसांनाही कथित धर्मनिरपेक्षवाद्यांनी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले होते. या चकमकीत इशरतसोबतच तिचे जे मित्र ठार झाले होते, ते सर्वच पाकिस्तानी नागरिक असल्याचेही स्पष्ट झाले होते.
गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी इशरत आणि तोयबाचे अन्य अतिरेकी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हत्या करण्याच्या मोहिमेवर भारतात आले होते. इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) याबाबतचा अहवाल दिल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी या अतिरेक्यांना शहराबाहेरच गाठले होते. यावेळी झडलेल्या चकमकीत हे सर्व अतिरेकी ठार झाले होते.
डेव्हिड हेडलीने नुकतीच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माफीचा साक्षीदार बनण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने त्याला माफीचा साक्षीदार बनण्याची सशर्त परवानगी दिली आहे. गुरुवारी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता ८ फेबु्रवारी रोजी त्याची पुढील साक्ष होणार आहे. त्याची ही साक्ष पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26144

Posted by on Dec 12 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1028 of 2453 articles)


=आरोग्य मंत्री दीपक सावंत यांची माहिती= नागपूर, [११ डिसेंबर] - मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये नवे डायलिसिस ...

×