Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » इशरत प्रकरणातील याचिका फेटाळली

इशरत प्रकरणातील याचिका फेटाळली

supreme-court_6नवी दिल्ली, [११ मार्च] – इशरत जहॉं प्रकरणी गुजरातमधील पोलिसांवर सुरू असलेले खटले आणि त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळली आहे. डेव्हिड हेडलीने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली.
मुंबई हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडलीने मुंबई न्यायालयासमोर साक्ष देताना म्हटले होते की, इशरत जहॉं लष्करे तैय्यबाचीच दहशतवादी होती. तसेच इशरत जहॉंसह त्या दिवशी चकमकीत चौघेजण मारले गेले तेही दहशतवादीच होते. त्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. वकील एम एल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती. मात्र ही जनहित याचिका आज फेटाळली आहे. न्यायमूर्ती पी. सी. घोष आणि न्या. अमितवा रॉय यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. आपण गुणवत्तेच्या आधारावर ही याचिका फेटाळत नसून, याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना न्यायालयाने केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27226

Posted by on Mar 12 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (696 of 2453 articles)


=घर खरेदी करणार्‍यांना दिलासा= नवी दिल्ली, [१० मार्च] - मोदी सरकारसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे रियल इस्टेट (नियमन आणि विकास) ...

×