Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » इसिसची अडीच लाख खाती ट्विटरकडून बंद

इसिसची अडीच लाख खाती ट्विटरकडून बंद

twitterनवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – दहशतवादी कारवायांसाठी सोशल नेटवर्किंग साईट्‌सचा वाढता वापर आणि प्रक्षोभक भाषणे पोस्ट करण्याचे प्रकार मोडून काढण्यासाठी ट्विटरने कडक पावले उचलली असून, इसिस या जहाल दहशतवादी संघटनेशी संबंधित सुमारे अडीच लाख खाती तातडीने बंद केली आहेत.
ट्विटरच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने याबाबतची माहिती आज शनिवारी दिली. या अधिकार्‍याच्या मते, आम्ही जी खाती बंद केली आहेत, त्या खात्यांच्या माध्यमातून दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात येत होते. प्रक्षोभक भाषणे अपलोड करून युवकांची दिशाभूल केली जात होती. याशिवाय, दंगलींना प्रोत्साहन मिळेल, असे व्हिडीओ देखील अपलोड केले जात होते.
बंद करण्यात आलेली बहुतांश खाती इसिसशी संबंधित आहेत. गेल्या काही वर्षांपासून या खात्यांचा वापर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठीच होत असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29217

Posted by on Aug 21 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (116 of 2453 articles)


=ट्रायची ग्राहकांना खुशखबर= नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] - इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, तसेच नव्या ग्राहकांना ...

×