Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » इसिसच्या ६० तळांवर रशियाचे हवाई हल्ले

इसिसच्या ६० तळांवर रशियाचे हवाई हल्ले

=३०० अतिरेक्यांचा खात्मा=
WAR SHIP-russiaमॉस्को, [१० ऑक्टोबर] – रशियाच्या हवाई दलाने गेल्या २४ तासांत इसिसच्या सीरियामधील सुमारे ६० तळांवर जोरदार हवाई हल्ले केले. यात ३०० पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे.
इसिसचे कमांड, दूरसंचार यंत्रणा आणि प्रशिक्षण शिबिरांना रशियाने लक्ष्य बनविले. एसयू-३४ आणि एसयू-२५ या लढाऊ विमानांमधून हे हल्ले करण्यात आले, असे वृत्त संरक्षण मंत्रालयातील प्रवक्त्याच्या हवाल्याने काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. सीरियातील रक्का, हमा, दमास्कस आणि ऍलेप्पो यासारख्या प्रांतांमध्ये हल्ले करण्यात आले असून, यात इसिसची ६० तळे उद्‌ध्वस्त झाली आहेत, असे वृत्तात म्हटले आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने इसिसविरुद्धची ही आजवरची सर्वांत मोठी कारवाई असल्याने स्पष्ट कले. रक्कामधील हल्ल्यात २०० आणि ऍलेप्पो येथील हल्ल्यात १०० पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले आहेत. यात मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठाही नष्ट झाला आहे, अशी माहिती रशियाच्या संरक्षण खात्याचे उपमंत्री लेफ्ट. जनरल इगोर माकुशेव्ह यांनी पत्रकारांना दिली.
दरम्यान, फ्रान्सनेही सिरियामध्ये इसिसच्या तळांवर नव्याने हवाई हल्ले सुरू केले आहेत. फ्रान्सचे संरक्षण मंत्री जीन यूस ली यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्या हवाई दलाने रक्कामध्ये इसिसच्या तळांवर मोठे हल्ले केले आहेत. राफेल या लढाऊ विमानांमधून इसिसच्या काही अड्‌ड्यांवर आम्ही बॉम्ब टाकले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25088

Posted by on Oct 11 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1353 of 2458 articles)


=नासाचा विश्‍वास= न्यूयॉर्क, [१० ऑक्टोबर] - मंगळावर मानवी जीवन अस्तित्वात आणण्याची आमची योजना आहे. आगामी काही दशकांमध्येच ही योजना यशस्वी ...

×