Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » इसिसपासून जगाला सर्वाधिक धोका

इसिसपासून जगाला सर्वाधिक धोका

=पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन=
modi in unoसंयुक्त राष्ट्रसंघ, [२६ सप्टेंबर] – दहशतवादाला धर्मापासून वेगळे करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. इसिस आणि अन्य काही दहशतवादी संघटनांपासून जगाला आज सर्वाधिक धोका निर्माण झाला असल्याने, त्यांचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास परिषदेला संबोधित केल्यानंतर पंतप्रधानांनी जॉर्डन नरेश अब्दुल्ला यांची भेट घेतली. या भेटीत इसिस आणि अन्य दहशतवादी संघटनांमुळे उद्‌भवलेल्या धोक्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. इसिसचा युवकांवर पडणारा प्रभाव रोखण्यासाठी, तसेच अशा गटांना जागतिक संदेश पाठविण्यासाठी कोणते उपाय करायला हवे, यावर पंतप्रधानांनी त्यांचे मत जाणून घेतले.
जागतिक शांततेला इसिसकडून मोठा धोका निर्माण झाला असल्याचे सत्य अब्दुल्ला यांनीही मान्य केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी धर्मापासून दहशतवादाला वेगळे करण्याची गरज व्यक्त केली. जॉर्डन नरेशांना त्यांचे विचार मान्य झाले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वंकष जाहीरनाम्याच्या प्रलंबित प्रस्तावाचा उल्लेख करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, या जागतिक महत्त्वाच्या मुद्यावर संपूर्ण जगाने एकाच सुरात बोलण्याची आणि जागतिक जाहीरनामा स्वीकार करण्याची आज नितांत गरज आहे. यावेळी पंतप्रधानांनी इराक व सीरियातील युद्धग्रस्त भागांमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जॉर्डन सरकारने दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल अब्दुल्लांचे आभार मानले. त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराचा मुद्दाही उपस्थित केला. जगातील एकषष्टांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारा भारतासारखा देश सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वापासून वंचित राहणे योग्य नाही, असे मतही पंतप्रधानांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24068

Posted by on Sep 27 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1408 of 2458 articles)


=६० टक्के नागरिकांना नसते जाणीव, सीएसआयचे सर्वेक्षण= नवी दिल्ली, [२६ सप्टेंबर] - प्रचंड धावपळीचे जीवन, अनियमित दिनचर्या, वाढती स्पर्धा, जगण्यासाठी ...

×