Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » इसिसविरुद्ध लढण्याचे विशेष अधिकार द्या

इसिसविरुद्ध लढण्याचे विशेष अधिकार द्या

=ओबामा यांचे आवाहन, अफगाणमधून सैन्य माघारीची घोषणा=
President Barack Obama Speaks at a Meeting of the Democratic Governors Associationवॉशिंग्टन, [२१ जानेवारी] – पाकिस्तानच्या पेशावर येथील सैनिकी शाळेपासून तर पॅरिसच्या रस्त्यांपर्यंत इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया ऍण्ड इराकच्या (इसिस) दहशतवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी नवे युद्ध छेडण्याची आवश्यकता आहे. या युद्धासाठी आपल्याला विशेष अधिकार देण्यात यावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज बुधवारी सिनेट व कॉंग्रेससह नागरिकांना केले.
इसिस विशेषत: इस्लामी दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरत असलेल्या जगभरातील नागरिकांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभे राहायचे आहे. पेशावरच्या शाळेपासून तर पॅरिसच्या रस्त्यांवर उतरलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करावाच लागणार आहे, असे ओबामा यांनी आपल्या वार्षिक राष्ट्र संबोधनात बोलताना सांगितले. याचवेळी ओबामा यांनी अफगाणिस्तानमधून आपल्या देशाच्या फौजा माघारी घेण्याची औपचारिक घोषणाही केली. तब्बल १४ वर्षे तालिबान्यांविरोधात लढा दिल्यानंतर ओबामा यांनी अफगाणमधून आपल्या फौजा माघारी घेण्याची घोषणा केली. अमेरिकेवर ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अफगाणमध्ये तालिबानविरोधात हाती घेण्यात आलेली मोहीम आता थांबविण्यात आली आहे.
येणार्‍या काळात आपल्याला काय करायचे आहे, हे ठरविले पाहिजे. गेल्या १४ वर्षात संपूर्ण जगानेच युद्ध आणि दहशतवादी हल्ले सोसले आहेत. सध्या अमेरिकेतील बेरोजगारीचा दर आर्थिक मंदीपेक्षा कमी आहे. अमेरिका आता तेल आणि गॅस क्षेत्रात पहिल्या स्थानावर आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेतील सुमारे एक कोटी नागरिकांनी आरोग्याचा विमा उतरविला आहे.
अध्यक्षपद स्वीकारल्यापासून मी सातत्याने दहशतवादविरोधात लढा दिला आहे. पण, हा लढा संपलेला नाही. आता सीरिया आणि इराकमधील दहशतवाद्यांनी डोके बाहेर काढले आहे. संपूर्ण जगाला नवा धोका निर्माण झाला आहे. इराक आणि अफगाणमधील लढ्यातून अमेरिका खूप काही शिकली आहे. अफगाणिस्तानमधील सुरक्षा दलांना आम्ही विशेष प्रशिक्षण दिले आहे. सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यास हा देश आता सक्षम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19875

Posted by on Jan 21 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (2202 of 2458 articles)


मुंबई, [२१ जानेवारी] - गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले गृहकर्ज यामुळे सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना हक्काचे घर ...

×