Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » इसिस दहशतवाद्यांच्या तळांवर रशियाचा हल्ला

इसिस दहशतवाद्यांच्या तळांवर रशियाचा हल्ला

=इसिसचे ११ तळ उद्ध्वस्त=
4 Russian warships launch 26 missiles on isisमॉस्को, [८ ऑक्टोबर] – रशियाच्या लढाऊ नौकांनी क्रूज मिसाइलद्वारे सीरीयामधील इसिस दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला आहे. रशियाने काल बुधवारी चार लढाऊ नौकांच्या मदतीने कॅस्पियन समुद्र मार्गे १५०० किलोमीटर अंतरावरून २६ क्रुझ मिसाइल डागल्या. यात इसिसचे ११ तळ उद्ध्वस्त झाल्याचे रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी शोइगू यांनी सांगितले आहे.
रशियाचे वॉरशिप समुद्रात तैनात आहे. या समुद्राची सीमा रशिया, इराणसह इतर देशांना मिळते. त्यामुळे या मिसाइल इराण आणि इराकच्या एअरस्पेसमधून जात असल्याने या दोन देशांची मदत घेत रशियाने २३ फाइटर जेटच्या माध्यमातूनही सीरियामध्ये या आठवडाभरात १२० हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र यात कुणी सामान्य नागरिक ठार झाल्याची माहिती नाही.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे इसिस अनेक ठिकाणी कमकुवत पडली आहे. यात दहशतवाद्यांचे १९ कमांड पोस्ट, १२ शस्त्र डेपो, ७१ शसस्त्र वाहने आणि त्यांच्या शस्त्रत्रनिर्मितीचे काही कारखानेही रशियाने उद्ध्वस्त केली आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25064

Posted by on Oct 8 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1362 of 2458 articles)


भाजपाचा निर्णय पूर्ण ताकदीने प्रचारात उतरविणार ४० सभांचे नियोजन नवी दिल्ली, [७ ऑक्टोबर] - बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत ...

×