Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » इसीसचा खात्मा तीन वर्षात अशक्य

इसीसचा खात्मा तीन वर्षात अशक्य

=अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ऍशटन कॉर्टर यांचे मत=
Ashton-Carter-US MINISTERवॉशिंग्टन, [११ मार्च] – इराक आणि सीरियात उच्छाद मांडलेल्या आयएसआयएस या दहशतवादी संघटनेविरोधात अमेरिकेने लष्करी मोहीम उघडली आहे. त्यासाठी तीन वर्षांची मुदत निर्धारित करण्यात आली आहे. मात्र, एवढ्या कमी कालावधीत आयएसआयएसचा खात्मा शक्य नसल्याचे मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ऍशटन कॉर्टर यांनी व्यक्त केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्या महिन्यात आयएसआयएस विरोधात युद्ध छेडण्याचा अधिकार देणारे विधेयक संमत केले होते. यामध्ये पायदळाचा वापर न करण्याबरोबर वायुसेनेचा मर्यादित वापर करण्याचे सुचविण्यात आले होते. तसेच, या युद्धासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता. मात्र, आयएसआयएसचा खात्मा तीन वर्षात शक्य नसून, त्यासाठी अधिक कालावधी लागण्याची शक्यता कॉर्टर यांनी व्यक्त केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21303

Posted by on Mar 13 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1935 of 2458 articles)


=केजरीवाल यांच्यावर यादव यांचा घणाघाती आरोप= नवी दिल्ली, [११ मार्च] - देशातील राजकीय व्यवस्था स्वच्छ करण्याचा नारा देत राजकारणात उतरलेल्या ...

×