|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.64° C

कमाल तापमान : 32.21° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 7.73 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.21° C

Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

28.09°C - 32.99°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.63°C - 30.49°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.81°C - 30.35°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.83°C - 30.75°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.27°C - 32.16°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.08°C - 32.51°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » इस्रायलच्या मदतीने शहरं ‘स्मार्ट’ बनविणार- मुख्यमंत्री

इस्रायलच्या मदतीने शहरं ‘स्मार्ट’ बनविणार- मुख्यमंत्री

Devendra-Fadnavis5मुंबई, [२७ एप्रिल] – इस्रायलच्या सहकार्याने राज्यातील नागपूर, मुंबई, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या शहरांना ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस सध्या चार दिवसांच्या इस्रायल दौर्‍यावर आहेत. याच्या पहिल्या दिवशी त्यांनी तेलअविवचे महापौर रान हुल्दाई यांच्याशी संयुक्त भागीदारीबाबत चर्चा केली. महाराष्ट्र हे औद्योगिक विकासात अग्रेसर राज्य आहे. औद्योगिकीकरणामुळे नागरीकरणातही सातत्याने वाढ होत असल्याने शहरांच्या शाश्‍वत विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी आज तेलअविव येथे स्मार्ट सिटीची संकल्पना आणि त्याबाबत करावयाच्या उपाययोजना याबाबत तसेच शहरांचा सुनियोजित विकास साधण्यासाठी तंत्रज्ञान, समाज माध्यमे, लोकसहभाग आणि ई-गव्हर्नन्स यांच्या मदतीने राज्यातील मोठ्या शहरांना स्मार्ट सिटीमध्ये विकसित करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
तेलअविव हे शहर ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस २०१४’ मध्ये जगातील सर्वात ‘स्मार्ट सिटी’ म्हणून गौरविले गेले आहे. या शहरात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली. तसेच शहरांसमोरील संयुक्त आव्हाने आणि उपाययोजना, स्मार्ट शहर उपाययोजनेत भारतीय माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, अनुषंगिक कार्यक्रम राबविण्यासाठी लागणारे तज्ज्ञ, तंत्रज्ञान आणि उपाययोजना आदींबाबत सहकार्य करण्याचे यावेळी उभयपक्षी ठरविण्यात आले. महापालिकेकडून ऑनलाईन सेवा, माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक आणि वाहनतळ व्यवस्थापन, नागरी सुरक्षा आणि सेवा, शहरांच्या विकासाला प्रोत्साहन, हरित बांधकाम आणि शहरातील जमिनीचा महत्तम उपयोग करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या सर्वोत्तम उपाययोजनांचा उपयोग याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी इस्रायलचे माजी पंतप्रधान यित्झॅक राबिन यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी तेलअविवचे महापौर रान हुल्दाई उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी वॉर रूमलाही भेट देऊन संपूर्ण शहरावर देखरेख करणार्‍या यंत्रणेची पाहणी करून शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा व आपत्कालीन यंत्रणेची माहिती घेतली. यासोबतच मध्य-पूर्वेतील सर्वात मोठे शिंडर कॅन्सर हॉस्पिटल, तेलअविव विद्यापीठासह चेक पॉईंट व वेटिंट या सायबर कंपन्यांनाही भेटी दिल्या. तसेच तेलअविव विद्यापीठाचे प्रा. इराड यांच्याशीही चर्चा केली.

Posted by : | on : 28 Apr 2015
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g