Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » इस्रायलने दीर्घकालीन मैत्री करावी : सुषमा स्वराज

इस्रायलने दीर्घकालीन मैत्री करावी : सुषमा स्वराज

Sushma-Swaraj2जेरुसलेम, [१९ जानेवारी] – आर्थिक संबंध दृढ करणे भारत-इस्रायलच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय गरजेचे असून, दोन राष्ट्रांमध्ये व्यापाराशिवाय इतरही क्षेत्रात दिर्घकालीन संबंध प्रस्थापित होणे आवश्यक असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वरुची भोज कार्यक्रमात त्यांनी हे विचार व्यक्त केले. संरक्षण, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात सहकार्य वृद्धींगत करण्यावर त्यांनी भर दिला आहे. द्विपक्षीय संबंधांसंदर्भात बोलतांना त्यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांच्या वाक्याची आठवण करून दिली. दोन देशातील सहकार्यासंदर्भात आकाश ठेंगणे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. नव्या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी आपण प्रयत्न करावयास हवे. गुंतवणूक, उत्पादन या क्षेत्रातही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. यामुळे मैत्री आणि आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी दोघांनाही उपलब्ध होईल, असे त्या म्हणाल्या.
याआधी त्यांनी इस्रायलच्या नेतृत्त्वाशी द्विपक्षीय संबंध आणि क्षेत्रीय प्रश्‍नांवर चर्चा केली. मेक इन इंडिया, स्वच्छ गंगा आणि डिजिटल इंडिया यासारख्या योजनेत इस्रायल भारताला मदत करू शकतो. राष्ट्राध्यक्ष रॉवेन रिवलीन, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूू आणि इतर इस्रायली नेत्यांसोबत झालेली चर्चा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडल्याचेही सुषमा स्वराज यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26589

Posted by on Jan 20 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (895 of 2458 articles)


=रा. स्व. संघाची भूमिका= पणजी, [१९ जानेवारी] - पोर्तुगालचे पंतप्रधान ऍन्टोनिओ कोस्टा हे जर गोव्याच्या भेटीवर येणार असतील, तर तब्बल ...

×